Fake Note : कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील सारस्वत बॅंकेत 500 रुपयांचा बनावट नोटांचा भरणा

सारस्वत बॅंकेच्या काटेमानिवली शाखेतील नियंत्रक अधिकारी मृदुला नेहेरकर यांच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल
payment of rs 500 fake notes at saraswat bank in kalyan bank dombivali
payment of rs 500 fake notes at saraswat bank in kalyan bank dombivalisakal

डोंबिवली - कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील सारस्वत बॅंकेच्या एटीएममध्ये अज्ञात व्यक्तीने 500 रुपयांच्या 16 बनावट नोटा भरणा केल्याची घटना घडली आहे. बुधवारी अज्ञात ग्राहकाने या नोटांचा भरणा केला असून बॅंकेच्या पडताळणी मध्ये या नोटा बनावट असल्याचे उघड झाले आहे.

सारस्वत बॅंकेच्या काटेमानिवली शाखेतील नियंत्रक अधिकारी मृदुला नेहेरकर यांच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारस्वत बँकेचे कल्याण पूर्वमधील काटेमानिवली विभागात रक्कम भरणा आणि रक्कम काढण्यासाठी एटीएम मशीन आहेत.

payment of rs 500 fake notes at saraswat bank in kalyan bank dombivali
Fake Currency Notes : सावधान! तुमच्याकडे नकली नोटा आल्यात का? 500 च्या नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड

बुधवारी सकाळी 11 च्या दरम्यान एका अज्ञात ग्राहकाने एटीएम मशीन मध्ये 500 रुपयांच्या 16 नोटा भरल्या. तसेच तेवढीच रक्कम त्याने दुसऱ्या एटीएममधून काढण्याचा प्रयत्न केला. एटीएममधील जमा आणि काढलेल्या नोटांचा ताळेबंद करत असताना बँक अधिकाऱ्यांच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा अज्ञात इसमाने एटीएममध्ये भरणा केल्या आहेत हे निदर्शनास आले.

payment of rs 500 fake notes at saraswat bank in kalyan bank dombivali
Bank Employees: सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा वाढणार! अर्थ मंत्रालयाने IBAला दिल्या विशेष सूचना

या प्रकाराने बँकेत खळबळ उडाली. बँक अधिकारी मृदुला नेहेरकर यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रण तपासून आरोपीचा शोध घेत आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर पगारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com