Mumbai : मुंबई सेंट्रलमध्ये पादचारी पूल; एमआरव्हीसीकडून गर्डर उभारणी पूर्ण

जून अखेर काम पूर्ण करून प्रवाशासाठी खुला करण्याचे नियोजन!
Pedestrian bridge Mumbai Central Construction of girder completed by MRVC railway
Pedestrian bridge Mumbai Central Construction of girder completed by MRVC railway sakal

मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात ५० मीटर लांबीच्या नवा पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल मेल- एक्सप्रेस आणि लोकल प्लॅटफार्मला जोडण्यात येणार आहे. ह्या नव्या पुलासाठी अंदाजित ६ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) देण्यात आली.

मुंबई सेंट्रल स्थानक पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या स्थानकातून मेल- एक्सप्रेस गाड्या आणि लोकल सेवा धावतात. लोकल स्थानकातून मेल-एक्स्प्रेस फलाटाच्या दिशेला जाण्यासाठी सध्या स्थानकात ६ मीटरचा पूल आहे. या पुलाचे आयुर्मान पूर्ण झाले असून सध्याची प्रवासी वर्दळ लक्षात घेता हा पूल अपुरा पडत असल्याचे दिसून आले आहे.

यामुळे मुंबई सेंटल स्थानकात नवीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. नव्या पादचारी पूलाची लांबी ५० मीटर असणार आहे. फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाच या सर्व फलाटांना पुलाची जोडणी देण्यात येणार आहे. सध्याच्या ६ मीटर रुंद पुलाच्या तुलनेत हा पूल मोठा म्हणजेच १० मीटर रुंद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी पुलावरुन हाताळणे शक्य होणार आहेत.

सध्या दोन क्रेनच्या मदतीने पुलावर गर्डर उभारण्यात आलेला आहे. ३० जून अखेर पुलाचे काम पूर्ण करून हा पूल प्रवासी वापरासाठी खुला करण्याचे नियोजन आहेत. हा नव्या पादचारी पुला मुंबई सेंट्रल स्थानकात विरार दिशेला पूर्व-पश्चिम दिशेसह सर्व फलाटांना जोडणारा आहे. या पुलामुळे नायर हॉस्पिटल आणि ताडदेव आरटीओ परिसरात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी या पुलाचा वापर करतात येणार असल्याची माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com