मुंबईत चौघांना पुन्हा झालेली कोरोनाची लागण, दुसऱ्यांदा कोरोना झालेल्या डॉक्टरांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे

भाग्यश्री भुवड
Thursday, 24 September 2020

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

मुंबई, 24: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये अनेक डॉक्टरांचाही समावेश आहे. पण जागतिक स्तरावर झालेल्या एका निरीक्षणामध्ये डॉक्टरांना दुसऱ्यांदा झालेला कोरोनाचा संसर्ग हा तीव्र असल्याचे म्हटले आहे. पहिल्यांदा झालेला संसर्ग हा बऱ्याचअंशी लक्षणेविरहित होता. मात्र पुन्हा झालेली कोरोनाची लागण गंभीर असल्याचे म्हटले आहे. लॅन्सेट अहवालात मांडण्यात आलेल्या एका निरीक्षणात डॉक्टरांना दुसऱ्यांदा झालेला कोरोनाचा संसर्ग हा तीव्र असल्याचे म्हटले आहे. 

महत्वाची बातमी : कोरोना संसर्गातून ब-या झालेल्या रुग्णांना जाणवतात पचन विकाराच्या समस्या 
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याची लक्षणे यासंदर्भात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. दिल्लीत नोएडा येथील दोन डॉक्टर, मुंबईतील नायरमधील तीन डॉक्टर आणि हिंदुजा रुग्णालयातील एका डॉक्टरचा यात समावेश आहे. दिल्ली येथील जेनोमिक्स अँड इंटेग्रेटीव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक अभियांत्रिकी आणि बायोटेक्नॉलॉजी (आयसीजीईबी) यांच्यासह दोन रुग्णालयांद्वारे केलेल्या संशोधनात आठ जीनोममध्ये 39 उत्परिवर्तन आढळले.  (पहिल्या संसर्गाचे प्रत्येकी चार नमुने आणि दुसर्‍या संसर्गाचे चार नमुने) घेऊन हा अहवाल मांडण्यात आला आहे.

महत्वाची बातमी : शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

यामध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झालेले डॉक्टर हे तरुण होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा झालेल्या संसर्गात कोणताही श्वसनविकार आढळला नाही. परंतु दुसऱ्यावेळी या डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागत आहेत. यातील एका डॉक्टरवर तीन दिवस उपचार सुरु आहेत. आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईनवर काम करणारे असल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते, असे या संशोधनात सहभागी असलेल्या नायर रुग्णालयातील डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले. संशोधन अहवाल जागतिक पातळीवर सुरु आहे. आपल्याकडे त्याचे प्रमाण अल्प असल्याचेही त्या म्हणाल्या.

महत्वाची बातमी :  फक्त रुग्णांसाठी, जलमय परिसरातही नायर रुग्णालयातले डॉक्टर कर्तव्यासाठी तत्पर

जवळपास मन्हिन्याभरापुर्वी हाँगकाँगमध्ये पाहिली पुन्हा संसर्ग झाल्याची केस समोर आल्यानंतर जगभरात अश्या अनेक पुन्हा संसर्ग झाल्याच्या घटना समोर आल्या. टीमच्या असे निदर्शनास आले आहे की पुन्हा संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये डी 614 जी उत्परिवर्तन आढळले, ज्याला स्पाइक प्रोटीन म्हणून ओळखले जाते ज्यामुळे विषाणूचे संक्रमण होण्यास सोपे होते. “डी 614 जी “ उत्परिवर्तन हा लोकांमधील गंभीर संसर्गाशी संबंधित आहे, त्यामुळे, या तरुणांमध्ये आधीच्या संसर्गाच्या तुलनेत त्यांचे दुसरे संक्रमण गंभीर होते, अशी माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

( संपादन - सुमित बागुल ) 

people who are second time covid infected are observed to have seviour symptoms 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people who are second time covid infected are observed to have serious symptoms