लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ; पण कशासाठी? वाचून तुम्हालाही धक्का बसेल...

संजय घारपुरे
गुरुवार, 16 जुलै 2020

'अपनालय' या स्वंयसेवी संस्थेने एम पूर्व मधील शिवाजी नगर झोपडपट्टीतील 619 जणांचे मत जाणून घेतले. त्यातील 46.7 टक्क्यांनी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कमाई बंद झाली असल्याचे सांगितले.

मुंबई : मार्चपासून देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद पडले आहेत, त्यामुळे अनेकांवर बेकारीची वेळ आली आहे. आता घरचे पैसे संपल्यामुळे कर्ज काढण्याची वेळ आली आहे. त्यात रेशनसाठीच नव्हे तर पाण्यासाठी कर्ज काढले जात असलेल्या 'अपनालय' या स्वयंसेवी संस्थेच्या पाहणी अहवालात म्हटले असल्याचे वृत्त आहे. कोरोना महामारीच्या आक्रमणामुळे आलेल्या लॉकडाऊनमुळे कोणावर काय वेळ आली आहे हे सांगता येत नाही. आता तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या पाण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे. 

मुंबईचे एक पाऊल पुढे; गतवर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात 'अशी' झाली वाढ...

'अपनालय' या स्वंयसेवी संस्थेने एम पूर्व मधील शिवाजी नगर झोपडपट्टीतील 619 जणांचे मत जाणून घेतले. त्यातील 46.7 टक्क्यांनी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कमाई बंद झाली असल्याचे सांगितले. सर्वेक्षणातील 70 टक्के लोकांनी रेशन आणि पाण्यासाठी आपण मित्र तसेच नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले असल्याचे सांगितले. आता जवळपास 80 टक्के लोकांकडे रेशन घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यातील अनेकांना लॉकडाऊन संपल्यावरही परिस्थिती फारशी बदलेल असे वाटत नाही.  

शुल्कासाठी खारघरमधील शाळेचा असाही प्रताप; ऑनलाईन शिक्षणच केले बंद...

बारा टक्के लोकांनी पाण्यासाठी कर्ज घेतल्याचे सांगितले, तर 42 टक्के जणांनी रेशनसाठी अशी माहीती 'अपनालय' चे रघुनंदन हेगडे यांनी सांगितल्याचेही वृत्तात म्हटले आहे. देवनार डंपिंग ग्राऊंड शेजारील शिवाजी नगर झोपडपट्टीत सहा लाख लोक राहतात. तिथे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहांच्या पुरेशा सुविधा नाहीत. या ठिकाणी प्रामुख्याने कामगार, घरकाम करणारे, छोटे उद्योग करणारे राहतात. त्यांतील अनेकांसमोर कमाईचा प्रश्न आहे. 

राज्यातील कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती; 10 लाख लोकसंख्येमागे होतात केवळ 'इतक्या' चाचण्या...

झोपडपट्टीत राहणारे अनेक जण योजनांपासून दूर राहतात. कोरोनामुळे आरोग्याचेच नव्हे तर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तिथे काम करणाऱ्यांच्या कामाचा प्रश्न जास्तच गंभीर झाला आहे, याकडे 'अपनालय'चे सीईओ अरुण कुमार यांनी लक्ष वेधले. आता या शिवाजी नगर झोपडपट्टीतील सरासरी उत्पन्न कमी झाले आहे. महिन्याला चार हजार मिळणाऱ्यांची संख्या 17 टक्क्यावरुन 27 टक्क्यांवर गेली आहे. महिना 8 ते 10 हजार कमाई असलेल्यांचे प्रमाण 27 टक्क्यांवरुन 4.8 टक्क्यांवर गेले आहे.
----
संपादन :  ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peoples in m east ward of mumbai takes loan for water