राज्यातील कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती; 10 लाख लोकसंख्येमागे होतात केवळ 'इतक्या' चाचण्या...

मिलिंद तांबे
गुरुवार, 16 जुलै 2020

24 जूनपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 73 कोरोना रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये 38,594 आयसोलेशन बेड, 5900 आयसीयू बेड आणि 2271 व्हेंटिलेटर आहेत.

मुंबई : राज्य सरकारने आधीपासूनच देशात सर्वात जास्त चाचणी दर असल्याचा दावा केला आहे. 16 जुलै पर्यंत राज्यात कोरोनाच्या चाचणी करणाऱ्या 106  प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी 61 सरकारी आणि 44 खाजगी आहेत. एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईचे एक पाऊल पुढे; गतवर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात 'अशी' झाली वाढ...

देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात 10 लाख लोकसंख्येमागे केवळ 198 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचण्या करणाऱ्या 22 राज्यांमध्ये महाराष्ट्र 17 व्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. गोवा, त्रिपुरा, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्रात चाचण्यांची संख्या कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.

शुल्कासाठी खारघरमधील शाळेचा असाही प्रताप; ऑनलाईन शिक्षणच केले बंद...

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यानी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळेची स्थापना करणार असल्याचे सांगितले आहे. आणि त्यानुसार राज्यात चाचणी प्रयोगशाळांची संख्या 110 च्या वर गेली असल्याची माहिती दिली. देशात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तेव्हा राज्यात चाचणी प्रयोगशाळांची संख्या केवळ दोन इतकी होती. त्यानंतर वाढत्या लॅब सोबत चाचण्या वाढण्यासाठी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनच्या अटही शिथिल करण्यात आली.

राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 10 लाख लोकसंख्येमागे 198 कोरोना चाचण्या घेण्यात येत असल्याचे यातून समोर आले. त्यामुळे कोरोना चाचण्यांसाठी इतक्या लॅब असूनही चाचणी संख्या इतकी कमी का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

अरे बापरे!  लॉकडाऊन काळात तणावासोबत वाढतोय संताप; 'हे' आहे मुख्य कारण..वाचा महत्वाची बातमी..

24 जूनपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 73 कोरोना रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये 38,594 आयसोलेशन बेड, 5900 आयसीयू बेड आणि 2271 व्हेंटिलेटर आहेत. या  रुग्णालयांकडे आरोग्य सुरक्षा कर्मचारी आणि रूग्णांसाठी 2 लाख 84 हजार पीपीई कीट आणि 4 लाख 65 हजार 249 एन 95 मास्क उपलब्ध आहेत.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there is only 198 corona tests per one millions peoples in maharashtra, says health ministry