esakal | गणेशोत्सव मंडळांपुढे परवानगीचे विघ्न?
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

गणेशोत्सव मंडळांपुढे परवानगीचे विघ्न?

sakal_logo
By
टिम इ सकाळ

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (state Gov.) आखून दिलेल्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्याबरोबर नेहमीप्रमाणे मंडप बांधण्यासाठी परवानगी मागितली जात आहे; मात्र काही भागांत स्थानिक पालिका (Municipal) प्रशासन आणि पोलिसांकडून (Police) परवानगी घेण्यात अडथळे येत आहेत. राज्य सरकारने (state Gov.) ठरवून दिलेल्या अटी-शर्तींव्यतिरिक्तही हमीपत्रे मागितली जात आहेत. त्यामुळे त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मुंबई (Mumbai) सार्वजनिक गणेशात्सव समितीने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना पत्र पाठवून केली आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या नियमानुसार यंदाही गणेशोत्सव साजरा करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक मंडळांना गेल्या वर्षीच्या नियमानुसार परवानगी मिळणार आहे. गेल्या वर्षी ज्या मंडळांना परवानगी मिळाली, त्यांना सवलत दिली जाणार आहे. अशा मंडळांना यंदा विनाअडथळा परवानगी देण्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले होते; मात्र पालिकेकडून परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांकडून ती नाकारली जात असल्याचे सांगत समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी पालिकेच्या प्रभाग कार्यालयांकडून ठरलेल्या अटींव्यतिरिक्त हमीपत्र लिहून मागितले जात आहे.

काही ठिकाणी गणेशमूर्तीला हार-फुले आणि प्रसाद अर्पण करणार नाही, असे हमीपत्र मागितले जात आहे. काही भागांत अशी समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याचेही समितीने आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा: मिरा-भाईंदर : वेदरशेड आणि अनधिकृत बांधकामांचा मुद्दा महासभेत गाजला

दंडात्मक कारवाईचा इशारा

पालिकेच्या टी मुलुंड आणि आर-उत्तर दहिसर विभागात अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचा दावाही समन्वय समितीने केला आहे. व्यावसायिक जाहिराती स्वीकारायला परवानगी आहे; मात्र मुलुंडमधील अधिकाऱ्याकडून जाहिराती स्वीकारल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला जात आहे. दहिसर विभागात एकाही मंडळाला अजूनही परवानगी मिळालेली नाही. प्रत्येक दिवशी टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप समितीचे अध्यक्ष ऍ . नरेश दहिबावकर यांनी केला.

loading image
go to top