esakal | राज्यात अटी-शर्तीं शिवाय 'या' उद्योगांना परवानगी, 40 हजार एकर जमीन राखीव ठेवणार
sakal

बोलून बातमी शोधा

industries

राज्यात नव्याने येणाऱ्या उद्योगांसाठी राज्यसरकारने 40 हजार एकर जमीन राखीव ठेवली असून ही जमीन भाडेतत्वावर उपलब्ध असेल. तसेच अटी आणि शर्थीच्या परवानगी काढण्याच्या जंजाळातून नवीन उद्योगांना सूट देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्योगांना आमंत्रण दिले.

राज्यात अटी-शर्तीं शिवाय 'या' उद्योगांना परवानगी, 40 हजार एकर जमीन राखीव ठेवणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात नव्याने येणाऱ्या उद्योगांसाठी राज्यसरकारने 40 हजार एकर जमीन राखीव ठेवली असून ही जमीन भाडेतत्वावर उपलब्ध असेल. तसेच अटी आणि शर्थीच्या परवानगी काढण्याच्या जंजाळातून नवीन उद्योगांना सूट देण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्योगांना आमंत्रण दिले. राज्यात चौथ्या लॉकडाऊनची माहिती देताना ठाकरे यांनी भूमिपुत्रांना नोकरीची संधी असून ती मिळविण्याची संधी चुकवू नका, असे आवाहन ही केलेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन 4 च्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला,

महत्वाची बातमी सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?

“राज्यात 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. परप्रांतिय मजूर गावी गेले आहेत, जर मजुरांचा तुटवडा जाणवत असेल तर महाराष्ट्राला आत्मनिर्भर करण्यासाठी भूमिपुत्रांनी समोर यावे, असे आवाहन आज केले. 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाचे हे संकट पावसाळ्यापूर्वी संपवायचे आहे, असा निर्धारही बोलून दाखवला. मात्र त्याचवेळी त्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला गावाकडे न जाण्याची कळकळीची विनंती केली. 
मुख्यमंत्री म्हणाले की, परराज्यातील मजुरांना त्या त्या राज्यात सुरक्षित पाठवत आहोत, पण महाराष्ट्रातील कामगार, मजूरही आपल्याला कधी पाठवणार अशी विचारणा करत आहेत. 

Big News - क्या बात हैं ! प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी, नायरमधील रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांकडूनही विचारणा होत आहे, बाहेरच्यांना पाठवले आम्हाला कधी पाठवणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. यावर ठाकरे म्हणाले की,  तुम्ही तर आमचे आहात, तुम्हालाही गावाकडे सुरक्षित पोहोचवू, कृपा करुन तुम्ही चालत जाऊ नका, असे मुख्यमंत्री म्हणाले. गावी जाण्याची नितांत गरज आहे का? जर  तुम्ही गावी जाण्याऐवजी धीर धरला तर सर्वांसाठी बरं होईल, काही ग्रीन झोनमध्ये मुंबई-पुण्यातून गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही तुम्ही विचार करा, थोडा धीर धरा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुंबई-पुण्यातून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्यांमुळे स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. कारण हे नागरिक गावी गेल्यानंतर तिथे त्यांची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे तिथल्या स्थानिकांनाही त्याचा त्रास होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीडसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुंबई-पुण्यातून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

नक्की वाचा : दिलासादायक : मजुरांना पोहोचवण्यासाठी 'एसटी'ला मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत करता येणार मोफत प्रवास

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना राज्यातील नागरिकांना, विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना जिथे आहे तिथेच राहण्याचा, मुंबई-पुणे न सोडण्याचे आवाहन केले.

Permission for new industries in the state without conditions of permission: CM

loading image