'पाच दिवसांचा आठवडा' वर मुंबई उच्च न्यायालय देणार स्टे ?

'पाच दिवसांचा आठवडा' वर मुंबई उच्च न्यायालय देणार स्टे ?

मुंबई - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा सुरु झालाय. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. उद्या शनिवार आहे, उद्याच्या शनिवारपासून सरकारी कर्मचाऱ्यांना सुटी मिळणार आहे. दरम्यान याच 'पाच दिवसांचा आठवडा' या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सोलापुरातील एका संस्थेने ही याचिका दाखल केलीये. या याचिकेवर २ तारखेला सुनावणी होणार आहे. सोलापुरातील 'माय सोलापूर' या सामाजिक संस्थेच्या महेश गाडेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना आपल्या घरच्यांसोबत वेळ घालवता यावा, यासाठी दैनंदिन कामकाजात ४५ मिनिटं अतिरिक्त काम आणि ५ दिवसांचा आठवडा असा निर्णय महाविकास आघाडीतील सरकारने घेतला. २४ फेब्रुवारी रोजी हा निर्णय लागू करण्यात आला. आता सरकारच्या या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय. 

महेश गाडेकर यांच्या मते सरकारने केवळ प्रसिद्धीसाठी हा निर्णय घेतलाय. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून हा निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी त्यांनी केलीये. 

दरम्यान सरसकट सर्व शासकीय विभागांना हा निर्णय लागू होणार नाही. ज्यांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्या सेवा अत्यावश्यक विभागात येतात अशा विभागांना हा नियम लागू होणार नाही. शासकीय शाळा, महाविद्यालये अग्निशमनविभाग, महाराष्ट्र पोलिसांना हा निर्णय लागू होणार नाही. 

दरम्यान आता दोन तारखेला मुंबई उच्च न्यायालय गाडेकर यांची याचिका फेटाळतं का 'पाच दिवसांचा आठवडा' या निर्णयावर स्टे ऑर्डर आणतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.  

petition filed against governments decision of five days a week by mahesh gadekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com