Petrol Diesel Rate : सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या काय आहेत दर

Petrol Diesel Rate : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही
Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022
Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022esakal

Petrol Diesel Rate : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील काही भागांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर किंचित कमी झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किमतीवर आधारित असतात.गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरामध्ये चढ-उतार पहायला मिळत आहेत. याचा परिणाम भारतातल्या पेट्रोल डिझेलच्या दरावरही झाला आहे.

Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022
CM Eknath Shinde : 'स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली

भारतात दररोज पेट्रोलियम कंपनीकडून इंधनाचे भाव जारी केले जातात. बुधवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात किंचित घसरण झाली असल्याने देशातील काही भागांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत.

Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022
Seema Sachin Love Story: 'कराची टू नोएडा' सचिन सीमाची लव्हस्टोरी तर 'मेरा अब्दुल ऐसा नहीं है' मध्ये झळकणार अंजूची प्रेमकहानी..

गुरुग्रामध्ये पेट्रोल १६ पैशांनी, तर डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर जयपूरमध्ये पेट्रोलचा दर २९ पैशांनी, तर डिझेलचा दर २६ पैशांनी घसरला आहे. अहमदाबादमध्ये पेट्रोल ४७ पैसे, तर डिझेल ४९ पैशांनी घसरले आहे.

Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022
Jalgoan Protest News :जळगावात रस्त्यावरच्या खड्ड्यांचे केले पूजन; नागरिकांचे स्वयंस्फूर्त आंदोलन

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलचे दर जैसे थे आहेत. नोएडा शहरात पेट्रोल 33 पैशांनी महागलं असून डिझेल 32 पैशांनी महागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com