

PI Ramesh Tadvi Writes to DGP Over Harassment Claims
Esakal
रायगडच्या महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रमेश तडवी यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांसह आत्महत्या करत असल्याचं पत्र पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. नुकतीच पीआय तडवी यांची महाड शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक पदावरून नियंत्रण कक्ष अलिबागला बदली करण्यात आलीय. दोन वर्षात दोनदा बदलीमुळे व्यथित झालेल्या तडवी यांनी वरिष्ठांकडून जातीवाचक टोमणे, हीन वागणूक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप पत्रात केला आहे. महाड नगरपालिका निवडणुकीवेळी राड्यात आरोपी असलेल्या मंत्रीपुत्राला सहकार्य करण्यासाठी बेकायदेशीरपणे दबाव टाकल्याचा आरोपही रमेश तडवी यांनी केलाय.