स्टोन आर्टतून साकारले पंतप्रधान मोदींचे चित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

modi

स्टोन आर्टतून साकारले पंतप्रधान मोदींचे चित्र

ठाणे: स्टोन आर्ट पोट्रेटसाठी प्रसिद्ध असलेले ठाणे शहरातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र साकारले आहे. मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली गावाचे असणारे सुमन त्यांच्या गावातील नदीकाठी सापडणाऱ्या विविध आकाराच्या दगडांवर रंगांची उधळण करून व्यक्तींची हुबेहूब चित्रे रेखाटतात.

हेही वाचा: वरळी परिसरातील विकास कामांना मिळणार गती; आदित्य ठाकरे म्हणाले...

अशाच एका दगडावर त्यांनी नरेंद्र मोदींच्या चित्र काढले आहे. सर्वाधिक स्टोन आर्ट पोट्रेट साकारल्याबद्दल चित्रकार सुमन दाभोळकर यांची २९ मे २०२१ रोजी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. यापूर्वी त्यांनी अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, महेंद्रसिंह धोनी, उद्धव ठाकरे, इंदिरा गांधी, अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले अशा अनेक मान्यवरांची स्टोन आर्ट पोट्रेट साकारली आहेत. त्यांच्या या कलेचे कलारसिकांकडून कौतुक होत आहे.

नदीकाठी मला ज्या नैसर्गिक आकारातील दगड सापडला त्यातून मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्टोन आर्ट साकारण्याची कल्पना सुचली. दगडाचे मूर्तस्वरूप न बदलता मी हे स्टोन आर्ट साकारले आहे.- सुमन दाभोलकर, चित्रकार

loading image
go to top