

Piyush Goyal Clarifies Statement on NCP President Praful Patel
Esakal
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानानंतर राज्यात खळबळ उडालीय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही असा काही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. अध्यक्षपदाच्या गोंधळानंतर आता शेवटी पीयूष गोयल यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच चुकीच्या माहितीसाठी दिलगिरी व्यक्त केली.