Dr BabaSabheb Ambedkar Jayanti आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर पालिकेने असे केले नियोजन; वाचा संपुर्ण बातमी

आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात | Ambedkar's birth anniversary every year at Chaityabhoomi Dr. Followers come to greet Babasaheb Ambedkar

Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak
Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak sakal

Chaitya Dhoomi Dadar: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, 'राजगृह' येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे.

आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. अनुयायांना विविध प्रकारच्या नागरी सोयीसुविधा पुरवण्याच्या उद्देशाने पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.


Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : आज जयंती जगाच्या महानायकाची; निळ्या पाखरांचा जल्लोष

नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रिनवर चैत्यभूमीतून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष सेवा आदींचा देखील या सुविधांमध्ये समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत अनुयायांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. पालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमलेले आहेत. उपआयुक्त प्रशांत सपकाळे आणि सहायक आयुक्त अजितकुमार अंबी यांच्या देखरेखीखाली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पालिकेच्या जनसंर्क विभागाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारीत छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.


Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वाहतुकीत मोठे फेरबदल; या मार्गांचा वापर टाळावा..

चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्याना रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्तूपाची सजावट ही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच तोरणा द्वार, अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेक देखील सजविण्यात आले आहे.


Chaityabhoomi Dr. Babasaheb Ambedkar Smarak
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: मुख्य मिरवणुकीत असणार 17 मंडळांचा सहभाग; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांनी घेतली परवानगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com