Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वाहतुकीत मोठे फेरबदल; या मार्गांचा वापर टाळावा..

यामुळे चैत्यभूमी व आसपासच्या परिसरात 13 एप्रिल आणि 14 एप्रिल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतुकीतील गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीसानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
Dr. Babasaheb Ambedkar JayantiSakal

मुंबई: भारतरत्न’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी एकदिवस आधीपासूनच अभिवादन करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी 14 एप्रिल रोजी अनुयायांचा जनसागर लोटणार आहे.

यामुळे चैत्यभूमी व आसपासच्या परिसरात 13 एप्रिल आणि 14 एप्रिल मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतुकीतील गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीसानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत.

या संदर्भात त्यांनी अधिकृत पत्रक जाहीर केले आहे. शनिवारी 13 एप्रिल दुपारी 11 वाजल्यापासून ते रविवार 14 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत दादर चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर परिसराकडे जाणाऱ्या सर्व वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग वाहतूक पोलीसांनी दिले आहे.

एकेरी वाहतुकीसाठी रस्ते / वाहतुकीसाठी बंद रस्ते

1.एस. के. बोले रोडवर सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगीज चर्चपर्यंत एकेरी वाहतूक सुरू राहील, म्हणजे पोर्तुगीज चर्चपासून एस.के. बोले रोडवर सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने प्रवेश बंद राहील.

2.स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून येस बँकपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. तथापि स्थानिक रहिवाशांची वाहने शिवाजी पार्क रोड नं.5 म्हणजे पांडुरंग नाईक मार्गाने जाऊ शकतील.

3.रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल.

4.ज्ञानेश्वर मंदिर रोड, एस.व्ही.रोड जंक्शनपासून दादर चौपाटीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

5.सर्व प्रकारची जड वाहने, मालवाहू वाहतुकीची वाहने (बेस्ट बसेस वगळता) माहीम जंक्शन येथून एल. जे. रोड मार्गे वळविली जातील.

वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग

1.दक्षिण वाहिनी पश्चिम द्रुतगती मार्गे, बांद्रामार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी कलानगर जंक्शनकडे येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते सायन रेल्वे स्थानक किंवा 60 फूट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रुग्णालय येथे उजवे वळण घ्यावे. अन्यथा बांद्रा-वरळी सी लिंक मार्गे दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे.

2.उत्तर दिशेने महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शनकडून उत्तर वाहिनीवरून जाणाऱ्या वाहनांनी पी.डीमेलो रोड, बॅरिस्टर नाथ पै रोड, झकेरिया बंदर रोड, आय. ए. के मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेऊन सायन हॉस्पिटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे, अथवा बांद्रा-वरळी ,सागरी उड्डाणपूल मार्गे (सी लिंक ) उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे.

3. वाहनांनी डॉ. ई. मोजेस रोड, रखांगी चौक येथे उजवीकडे वळण घेऊन सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे.

4. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाने दक्षिणेकडे जाणारी वाहतूक या वाहनांनी वडाळा ब्रिजचा वापर करून बरकत अली नाका, बी. पी. टी. कॉलनी, पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करावा.

‘या’ रस्त्यांवर दोन्ही बाजूस नो पार्किंग

1. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग सेन्च्युरी जंक्शन ते येस बँक जंक्शन

2.रानडे रोड

3.केळुसकर रोड, दक्षिण व उत्तर

4.ज्ञानेश्वर मंदिर रोड

वाहने पार्क करण्यास उपलब्ध रस्ते

1.संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर

2.इंडिया बुल फायनांन्स सेंटर (PPL)

3.कोहिनूर स्क्वेअर कंपाऊंड, शिवाजी पार्क, दादर

4.कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग,

5.इंडिया बुल्स सेंटर, ज्युपीटर मिल कंपाऊंड, एल्फिन्स्टन

6. पाच गार्डन, आर.ए.के. 4 रोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com