esakal | १८ मे पासून देशात लागू होणार चौथा लॉक डाऊन? पाहा काय म्हणालेत मोदी... 
sakal

बोलून बातमी शोधा

१८ मे पासून देशात लागू होणार चौथा लॉक डाऊन? पाहा काय म्हणालेत मोदी... 

सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज पुन्हा एक मिटिंग घेतली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांकडून देशातील प्रत्येक राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि त्या त्या राज्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

१८ मे पासून देशात लागू होणार चौथा लॉक डाऊन? पाहा काय म्हणालेत मोदी... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज पुन्हा एक मिटिंग घेतली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांकडून देशातील प्रत्येक राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि त्या त्या राज्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

देशातील लॉक डाऊन हा कोरोनाची चेन तोडण्याचा एकमेव पर्याय आहे असं नरेंद्र मोदी यांनी कॉन्फरन्स अंती म्हटलंय. त्यामुळे येत्या काळात भारतात चौथा लॉक डाऊन लागणार याचे स्पष्ट संकेत नरेंद्र मोदी यांनी दिलेत. 

आईच्या दुधापासून तयार होऊ शकते कोरोनाच्या अँटीबॉडीज ?
 

काय म्हणालेत उद्धव ठाकरे ? 

  • महाराष्ट्रातील लॉक डाऊन १७ मे नंतरही उठवला जाऊ नये अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलीये. राजस्थान, पंजाब, तेलंगणा या राज्यांनी देखील याबाबतची मागणी केलीये. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केलीये.
  • याचसोबत अत्यावश्यक सेवांसाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी अशी देखील मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
  • महाराष्ट्राला GST परतावा मिळावा ही देखील मागणी मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये केली   

कमाल! टाकाऊ वस्तूंपासून तरुणानं तयार केलं ऑटोमॅटिक हॅंड वॉश मशीन

यावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगअंती लॉक डाऊन हा कोरोनाला थांबवण्याचा एकमात्र उपाय आहे. त्यामुळे लॉक डाऊन संपवून चालणार नाही असं मोदी म्हणालेत. या बैठकीत मोदींनी राज्यांना देखील काही अधिकार दिल्याचं समजतंय. ज्यामध्ये राज्यातील परिस्थितीनुसार मुख्यमंत्री काही बदल करू शकतात. याचसोबत पुढील लॉक डाऊन कसा असावा? यासंदर्भातील आराखडे सर्व राज्य सरकारांनी केंद्राकडे येत्या १५ तारखेपर्यंत देण्याच्या सूचना देखील केल्या गेल्यात. यामध्ये नवीन काही नियम किंवा कोणत्या शिथिलता राज्यांना हव्या आहे यांचा समावेश करण्याचं सांगण्यात आलंय. या अहवालाचा अभ्यास करून करून केंद्र सरकार येत्या १८ मे पासून पुढे कसा लॉक डाऊन असेल याबद्दल अधिक स्पष्टता देणार असल्याचं समजतंय.

PM narendra modi gives straight hint about implementing fourth lock down in country