कमाल! टाकाऊ वस्तूंपासून तरुणानं तयार केलं ऑटोमॅटिक हॅंड वॉश मशीन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

लॉकडाऊनमुळे दुकानातून सामान आणणे शक्य नसल्यामुळे त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर केला आणि दोनच दिवसांत हे  मशीन तयार केले. त्यासाठी त्यांना एक रुपयाही खर्च आला नाही.

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्याच्या प्रयत्नांना नवी मुंबईतील एका तरुणाने हातभार लावला आहे. सीवूड्स येथील महेंद्र धुरत याने टाकाऊ वस्तूंचा वापर करून स्वयंचलित हॅंड वॉश मशीन बनवले आहे. या कामगरिबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

नक्की वाचा रतन खत्री होता तरी कोण? करोडोची बक्कळ माया त्याने कशी जमवली? वाचा हा लेख...

सीवूड्स पश्चिम येथील सेक्टर 48-एमधील आदर्श सोसायटीत राहणारा महेंद्र धुरत सध्या लॉकडाऊनमुळे घरीच आहे. या फावल्या वेळेचा सदुपयोग त्याने ऑटोमॅटिक हॅंड वॉश मशीन बनवण्यासाठी केला. त्यासाठी त्याने एकही रुपया खर्च न करता केवळ टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती या मशीनला हात न लावता पॅडलचा वापर करून हात स्वच्छ धुवून सोसायटीत प्रवेश करू शकते.
कोरोनापासून बचावासाठी सोसायटीतील प्रत्येक जण काळजी घेत असला, तरी कामानिमित्त बाहेर जावे-यावे लागते. बाहेरून सोसायटीत येणाऱ्यांसाठी हॅंड वॉश व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, त्यासाठी लोकांना पाण्याचा नळ आणि हॅंड वॉशच्या बाटलीला सतत हात लावावा लागत होता. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका असल्याचे महेंद्र धुरत यांच्या लक्षात आले. त्यावर वेगळी व्यवस्था करण्याच्या विचारातून त्यांनी काम सुरू केले.

मोठी बातमी : रायगड एक्‍स्प्रेस सुधीर तांडेल यांचे निधन 

हात न लावता वापरता येईल असे ऑटोमॅटिक हॅंड वॉश मशीन बनवण्याचा निर्णय धुरत यांनी घेतला. परंतु, लॉकडाऊनमुळे दुकानातून सामान आणणे शक्य नसल्यामुळे त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर केला आणि दोनच दिवसांत हे  मशीन तयार केले. त्यासाठी त्यांना एक रुपयाही खर्च आला नाही. धुरत यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. 

हे ही वाचा : हळूहळू उद्योग खुलण्यास सुरवात; राज्यात २५ हजार कंपन्या सुरु, सहा लाख कामगार रुजू

असे आहे मशीन
हात धुण्याच्या बेसिनवरील नळाला सॅनिटायझरची बाटली आणि पाण्याची छोटी टाकी पाईपने जोडली आहे. वॉश बेसिनच्या खालच्या बाजूला हिरव्या आणि निळ्या रंगाचे पॅडल आहेत. पायाने हिरवे पॅडल दाबल्यावर नळातून सॅनिटायझर येते आणि निळे पॅडल दाबल्यावर नळातून पाणी येते. वॉश बेसिनवरील स्क्रीनवर हिरवा आणि निळा असे दोन एलईडी दिवे बसवले आहेत. पायाने दाबलेल्या पॅडलच्या रंगाचा दिवा त्यावर चमकतो. 

नक्की वाचाट्रेन्सचं ऑनलाईन बुकिंग आजपासून होणार सुरु, कसं कराल ऑनलाईन बुकिंग? जाणून घ्या 

सोसायटीमधील लोकांना कामानिमित्त बाहेर ये-जा करावी लागते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग घरापर्यंत येण्याचा धोका होता. खबरदारी घेतल्यास संसर्ग रोखता येईल, या विचाराने ऑटोमॅटिक हॅंड वॉश मशीन तयार केले. 
- महेंद्र धुरत, सीवूड्स, नवी मुंबई

young man made an automatic hand wash machine out of waste


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man made an automatic hand wash machine out of waste