"पोको'चा "एक्‍स 2' ग्राहकांच्या भेटीला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

शिओमी या स्मार्टफोन कंपनीची उपकंपनी असलेल्या "पोको' कंपनीने आपला मालिकेतील दुसरा "एक्‍स 2' स्मार्टफोन प्रसिद्ध केला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी 11 फेब्रुवारीपासून ऑनलाईन उपलब्ध असणार आहे,

नवी दिल्ली : शिओमी या स्मार्टफोन कंपनीची उपकंपनी असलेल्या "पोको' कंपनीने आपला मालिकेतील दुसरा "एक्‍स 2' स्मार्टफोन प्रसिद्ध केला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी 11 फेब्रुवारीपासून ऑनलाईन उपलब्ध असणार आहे, अशी माहिती नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात पोको इंडियाचे व्यवस्थापक मनमोहन चंडोलू यांनी दिली.

हेही वाचा - कोरोना नव्हे, थंडीमुळे मासे महागले

ग्राहकांच्या अपेक्षेला खरे उतरण्यासाठी "पोको एक्‍स 2' मध्ये 120 Hz डिस्प्ले, 64 मेगापिक्‍सल कॅमेरा आणि लिक्विडकूल तंत्रज्ञानाचा सामावेश करण्यात आला असल्याचे मनमोहन यांनी या कार्यक्रमावेळी सांगितले. पोको कंपनीच्या पहिल्या स्मार्टफोनला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्यात अत्याधुनिक बदल करून नव्या तंत्रज्ञानासह पोको ग्राहकांच्या भेटीला आला आहे. 

हेही वाचा - टिटवाळ्यातील हा पूल होणार बंद

या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे 6.67 इंचाचा डिस्प्ले, 64 मेगापिक्‍सल आयएमएक्‍स 686 सेन्सर असलेला कॅमेरा, 8 मेगापिक्‍सल वाईड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्‍सल डेप्थ कॅमेरा, 2 मेगापिक्‍सल मायक्रो कॅमेरा, 20 मेगापिक्‍सल + 2 मेगापिक्‍सल फ्रंट कॅमेरा, ऑक्‍टा कोअर कॉलकोम स्नॅपड्रॅगन 730 जी प्रोसेसर विशेष म्हणजे लिक्विडकूल तंत्रज्ञानासह 4500 mAh ची बॅटरी इत्यादी होय. "एक्‍स 2' स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये 11 फेब्रुवारीपासून उपलब्ध असणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Poco's" X2 Ready for sale on 11 FEB