टिटवाळा : टिटवाळा परिसरात आज पहाटे एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे..मिळालेल्या माहितीनुसार, भाऊराव दगडू ढगे (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते टिटवाळ्यातील पंचवटी परिसरातील गीतांजली बिल्डिंगमधील रूम क्रमांक १०३ मध्ये वास्तव्यास होते. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कातळापूर येथील रहिवासी असलेले ढगे हे मुंबईतील येलोगेट पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते..Accident: मुंबई–गोवा महामार्गावर मोठा अपघात! टेम्पो ट्रॅव्हलर पलटी; १० प्रवासी गंभीर जखमी .काल गावावरून परत आल्यानंतर आज पहाटेच्या सुमारास टिटवाळ्यातील रेल्वे पुलाखाली त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली..या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून टिटवाळा पोलीस ठाण्याने अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली..या घटनेमुळे पोलीस दलातील तणाव, मानसिक ताणतणाव आणि कामाच्या दबावाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून, सहकाऱ्यांनीही या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. टिटवाळा परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे..Kishori Pednekar: केवळ १५०० रुपयांनी महिलांना संरक्षण मिळणार नाही, किशोरी पेडणेकर यांची टीका.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.