खलबत्याने हत्या! पोलीस कॉन्स्टेबलचा कुटुंबानंच घेतला बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police
खलबत्याने हत्या! पोलीस कॉन्स्टेबलचा कुटुंबानंच घेतला बळी

खलबत्याने हत्या! पोलीस कॉन्स्टेबलचा कुटुंबानंच घेतला बळी

कल्याण (Kalyan) कोळसेवाडी परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आली आहे. खलबत्याने ठेचून पोलिस कॉन्स्टेबलची (Police Constable) हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पत्नी आणि मुलीला पोलिसांनी घेतले ताब्यात घेतलं आहे. पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून केली पोलीस कॉन्स्टेबलची हत्या (Crime News) केल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे.

हेही वाचा: CSMT स्थानकावर बॉम्ब असल्याची धमकी, एक ताब्यात

घरघुती कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याची शक्यता आहे. आपली मुलगी नांदायला जात नसल्यानं पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे, पत्नी आणि मुलगी यांच्यात सतत वाद होत असत. याच वादातून आईने आणि मुलीने मिळून ही हत्या केली असल्याचं समजतं आहे. या पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांनीच आपल्या ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: मुंबई : साकिनाक्यात 'लिव्ह इन पार्टनर'ने केला महिलेचा खून

दरम्यान, मुंबईतील (Mumbai) साकिनाक्यात देखील नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप (live in relationship) मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने २९ वर्षीय महिलेचा खून (woman murder) केला आहे. मनीषा जाधव असं या पीडित महिलेचं नाव आहे. याप्रकरणी आरोपी राजू नाले (४२) याला साकिनाका पोलिसांनी (sakinaka police) अटक केलीय. साकिनाका येथील संघर्ष नगरमध्ये असलेल्या म्हाडा फ्लॅटमध्ये ही घटना गुरुवारी घडली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimekalyan
loading image
go to top