esakal | उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे डिटेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे डिटेक्शन

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे डिटेक्शन

sakal_logo
By
दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : मागच्या महिन्याच्या 22 तारखेला अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गळा आवळून चेहरा जाळून टाकलेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हे डिटेक्शन करताना चारित्र्याच्या संशयावरून हत्या करणाऱ्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा: स्वातंत्र्याची सत्तरी; पण कोसेसरी भवाडी विकासापासून कोसोदूर

गायकवाड पाड्यातील भागूबाई चिकणकर यांच्या भाड्याच्या खोलीतून 22 ऑगस्ट रोजी असह्य दुर्गंधी येत होती. शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता खोलीत एका महिलेचा चेहरा जाळून टाकलेला मृतदेह मिळून आला होता. शवविच्छेदन अहवालात सदर महिलेचा गळा आवळून तिचा चेहरा जाळण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. सदर महिला ही 25 वर्षीय सुशिला साहेबराव निकाळजे उर्फ काजल असून तिच्या सोबत काही दिवसांपूर्वीच लग्न करणाऱ्या सुरज खरात याने चारित्र्याच्या संशयावरून तिचा खून केल्याची माहिती तपासात समोर येऊ लागली.

हेही वाचा: भाजपचा शिवसेनेला धक्का; आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांची उचलबांगडी

सुरजला शोधण्यासाठी तरडे यांनी पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संपत फटोळ, उपनिरीक्षक किशोर महाशब्दे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शाम रसाळ, सुरेंद्र पवार, संजय माळी, हवालदार महेश पाटील, विश्वास माने, विकास करणे ही टीम तयार करून आजूबाजूचे शहरे पिंजून काढली. काल 3 तारखेला सूरज हा बदलापूरातील कामगार नाक्यावर येणार असल्याची माहिती मिळताच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

सुशिलाचे वागणे बोलणे संशयास्पद वाटत होते. तिचे चारित्र्य चरित्रहीन जाणवत होते. 22 तारखेला तिच्याशी यावरून वादविवाद झाल्यावर तिचा गळा आवळून तिला ठार मारले आणि चेहरा जाळून दरवाजाला कुलूप लावून पळ काढल्याची कबूली आरोपी सूरज याने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

loading image
go to top