बेकायदा टेलिफोन एक्सचेंज प्रकरण: नेपाळ भेटीबाबत आरोपीची चौकशी सुरू; पाकिस्तानला माहिती पुरवत असल्याचा संशय..  

telephone exchange
telephone exchange

मुंबई:  गोवंडी येथील बेकायदा टेलिफोन एक्सचेंज प्रकरणी तीन चीनी कंपनींच्या कंपन्यांचे नाव पुढे आल्यानंतर आता आरोपीच्या नेपाळ वारीबाबत पोलिस तपास करत आहेत. नेपाळ भेटीबाबत आरोपी कोणतेही समर्पक उत्तर देऊ शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याच टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून लष्करी तळांवरही दूरध्वनी करण्यात आल्याचा संशय आहे.

याप्रकरणी अटक आरोपी समील अलवारी नेपाळला गेला आहे. या प्रवासाबाबत विचारले असता त्याने केणतेही समर्पक उत्तर दिले नसून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या टेलिफोन एक्सचेंज मार्फत 11 लाखांची कमाई करणा-या आरोपीने नेपाळ भेटीतच या सर्व व्यवहाराबाबत बैठक केल्याचा संशय आहे. पण अद्याप कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या बेकायदा टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून 30 लाख दूरध्वनी करण्यात आले असून सरकारचा 20 कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील दोन क्रमांकाच्या सहाय्याने हे सर्व दूरध्वनी डायवर्ट करण्यात आले आहेत.  आरोपी सराईत त्याच्याबाबतची माहिती जम्मू काश्मिर पोलिस व लष्करी गुप्तचर विभागाला मिळाली.  ही माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना देण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून पोलिस  तीन दिवस संशयीत आरोपीचा शोध घेतला होता. त्याच्याकडून 223 सीमकार्ड व पाच सीमबॉक्स हस्तगत करण्यात आले. 

याबाबत अधिक तपास केला असता आखाती देश व पाकिस्तानातून दूरध्वनी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशी दूरध्वनी अथवा व्हिओआयपी दूरध्वनी या बेकायदा एक्‍स्चेंजच्या माध्यमातून वळवले जातात. सिम बॉक्‍स आणि इंटरनेटच्या माध्यमातून सर्व्हरवर घेऊन हे कॉल संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवले जात असल्याने त्यांची नोंदही होत नव्हती. 

तसेच ज्या व्यक्तीला दूरध्वनी केले जातात त्याला भारतीय मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला असल्याचे वाटायचे. त्यामुळे या बेकायदा यंत्रणेचा वापर करून पाकिस्तानी यंत्रणांनी भारतीय लष्करी तळांमधील माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे का, याबाबत तपास सुरू आहे. आरोपीच्या खात्यावर चीनी साथीदाराकडून काही पैसेही जमा झाले आहेत.

police investigating telephone exchange case in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com