Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Mumbai Police Viral Video: पोलिसाकडून महिला आंदोलकांचा गैरवर्तन केल्याचा आरोप करत काॅंग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ व्हायरल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Mumbai Police Misbehave with female protester

Mumbai Police Misbehave with female protester

ESakal

Updated on

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विविध मागण्यांसाठी देशभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन आणि निदर्शने काढली जात आहेत. राजधानी दिल्लीसह अनेक शहरात आंदोलन केली जात असून या आंदोलनावेळी घडलेल्या अनेक घटनांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. अशातच मुंबई पोलिसाकडून एका तरूणीला विचित्र प्रकारे पकडून खेचताना दिसत असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ वर्षा गायकवाड यांनी पोस्ट करत मुंबई पोलिसांच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे. मात्र यावर मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com