esakal | गणेशोत्सवासाठी वसई-विरारमध्ये पोलिस, महापालिका प्रशासन सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

गणेशोत्सवासाठी वसई-विरारमध्ये पोलिस, महापालिका प्रशासन सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : वसई (Vasai) तालुक्यात गणेशोत्सव सणाला गेली दोन वर्षे अत्यंत साधेपण प्राप्त झाले आहे. कोरोना (Corona) संक्रमण होऊ नये याकरिता वसई-विरार (Vasai-Virar) शहर महापालिका व स्थानिक पोलिस (Police) यंत्रणा सज्ज झाली असून ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. आखून दिलेले नियम व कोरोनाचे (Corona) निर्बंध याकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, इशारादेखील देण्यात येत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. या संपूर्ण नियमावलीचे स्मरण सावर्जनिक गणेशोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांना देण्याकरिता पोलिसांकडून बैठका घेण्यात येत आहेत, तर महापालिकेकडून सूचना, नियम, विसर्जन तलावांची यादी आर्दीसंबंधी माहितीदेखील जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाबाबतचे सार्वजनिक मंडळ पाळते की नाही याची पाहणी महापालिकेचे पथक नऊ प्रभागातील ११५ वॉर्डमध्ये करणार आहे, तर पोलिसांचीदेखील करडी नजर असणार आहे.

कुठेही गर्दी किंवा नियमांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केल्यास त्वरित कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. याची माहिती देण्याचे काम बाप्पाच्या आगमनापूर्वीच केले जात आहे. मंडळांनीही जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: कोरोनाचे निर्बंध पाळत गणेशोत्सव साजरा करा; पोलिसांचं मंडळांना आवाहन

डहाणूत पोलिसांचे आवाहन

डहाणू आगामी गणेशोत्सव शांततेच्या मार्गाने पार पडावा, कोणतीही अनुचित घटना घडू नये, या हेतूने डहाणू पोलिस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, महिला दक्षता समिती सदस्य यांची संयुक्त सभा डहाणू पोलिस ठाणे येथे घेण्यात आली. या वेळी उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. शनिवारी (ता. ४) घेण्यात आलेल्या शांतता सभेला शांतता कमिटीचे २५ सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा: तलासरी येथे आठ लाखांचा मद्यसाठा जप्त; डहाणू उत्पादन शुल्क खात्याची कारवाई

महापालिका, पोलिसांचे नियम

• रस्त्याचा २५ टक्क्यांपेक्षा जास्त भाग व्यापू नये.

• वाहतुकीच्या मार्गावर मंडप खोदकामास परवानगी नाही.

• सार्वजनिक गणेशमूर्ती चार फूट, घरगुती दोन फूट उंचीची

• सावर्जनिक मंडळांनी जनजागृती, प्रबोधनावर भर द्यावा

• दर्शनासाठी सार्वजनिक मंडळांनी ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करावी.

● विसर्जनाच्या स्थळी आरती होणार नाही.

• बाप्पांचे आगमन व मिरवणुकांवर बंदी असेल. • विसर्जनाला एका मूर्तीसोबत केवळ चार व्यक्तींना परवानगी असेल.

loading image
go to top