ऑनलाईन लॉटरीवर पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

मुंबई : राज्य सरकारच्या ‘राजश्री’ या ऑनलाईन लॉटरी केंद्रावर ग्राहकांना कागदी चिठ्ठ्या दिल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने पठ्ठे बापूराव मार्गावरील लॉटरी केंद्रांवर छापा टाकला. कर चुकवण्यासाठी लॉटरी केंद्राच्या चालकांनी हा मार्ग अवलंबल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिवसेना म्हणतेय...फडणवीस तुम्ही कामाला लागा

पठ्ठे बापूराव मार्गावरील सरकारमान्य ऑनलाईन ‘राजश्री’ लॉटरी केंद्रांचे चालक राज्य सरकारचा कर आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) चुकवण्यासाठी ऑनलाईन तिकिटे न देता कागदी चिठ्ठ्या देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष क्र. २ ने बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली.

आपापल्या नवऱ्यांसाठी "त्या'' दोघींनी किडन्यांची केली आदलाबदली

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित दोन्ही लॉटरी केंद्रांवर छापा टाकला. या कारवाईत अरविंद ऑनलाईन लॉटरी केंद्रातून एक संगणक, हार्ड डिस्क, ३ हजार ८५० रुपये आणि नावे लिहिलेल्या चिठ्ठ्या; तसेच अम्मा भगवान लॉटरी केंद्रातून एक संगणक, हार्ड डिस्क, ९ हजार ५९० रुपये आणि नावे लिहिलेल्या चिठ्ठ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Police raid online lottery

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raid online lottery