
याप्रकरणी आतापर्यंत 35 हून अधिक व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले. त्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक संजय लीला भन्साली, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा तसेच सुशांतच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तीन सायकॅट्रीस्ट व एका सायकोथेरपिस्ट यांचा जबाब नोंदवला आहे. नोव्हेंबर 2019 पासून सुशांत त्यांच्याकडे मानसिक तणावावर उपचार घेत होता. सुशांतच्या मानसिक तणावाचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी हे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापूर्वी याप्रकरणी यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माते आदित्य चोप्रा यांची पोलिसांनी तब्बल चार तास चौकशी केली होती.
मातोश्रीवर कोरोनाची पुन्हा धडक! तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन...
तीन सायकॅट्रीस्ट व एका सायकोथेरपिस्टची याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी सोमवारी जबाब नोंदवला. 2019 डिसेंबरपासून सुशांत त्यांच्याकडे उपचार घेत होता. सुशांतच्या मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, सुशांतच्या मानसिक तणावाचे नेमके कारणाबाबत पोलिसांनी माहिती दिलेली नाही.
ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, ट्विटरवरुन दिली माहिती
याप्रकरणी आतापर्यंत 35 हून अधिक व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले. त्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक संजय लीला भन्साली, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा तसेच सुशांतच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. सुशांतसिंह राजपूतचा आदित्य चोपडा यांच्या यशराज फिल्म्ससोबत चित्रपट निर्मितीबाबत करार झाला होता. त्यामुळे आदित्य चोपडा यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती.
उद्यापासून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु; व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा
सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली होती. त्या दिवशी पोलिसांनी सुशांतचे वडील आणि इतर नातेवाईक यांना कुणावर संशय आहे का, असे विचारले होते. त्यांचा जबाब नोंदवला होता. मात्र, आता एक महिन्यानंतर पुन्हा पोलिसांनी सुशांतच्या नातेवाईकांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यास सुरुवात केली आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे