Mumbai : लाऊडस्पीकरबाबतच्या निर्देशांचे पोलिसांनी पालन करावे; मशिदीवरील भोंग्यावरून HCचे निर्देश

Mumbai High Court
Mumbai High CourtSakal media

मुंबई : रात्रीच्या वेळी लाऊडस्पीकर लावण्याबाबत निर्धारित केलेल्या कायदेशीर निर्देशांचे पालन पोलिसांनी करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिले आहेत.

Mumbai High Court
Mumbai : लेप्टो रोखण्यासाठी पावणे दोन लाख उंदीर मारले; एक उंदीर मारण्यासाठी पालिकेचे 22 रुपये खर्च

पश्चिम उपनगरातील कांदीवली येथील समता नगर पोलीस ठाण्याविरोधात ऍड. रिना रिचर्ड यांनी याचिका केली आहे. येथील ठाकूर व्हिलेज परिसरात असलेल्या मशिदीत रात्रीच्या वेळी उशिरा लाऊडस्पीकरचा वापर केला जातो. कायद्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई आहे. मात्र या नियमांचा वापर येथे केला जात नाही, असा आरोप याचिकेत केला आहे.

तसेच वारंवार पोलीस ठाण्यात तक्रार करुन आणि सोशल मिडियावर पोस्ट करुन देखील त्यावर कारवाई झाली नाही. यामुळे रिचर्ड यांनी उच्च न्यायालयात याचिका केली.

Mumbai High Court
Mumbai : पोक्सो कायदा लैंगिक शोषण रोखण्यासाठी, पण संबंध सहमतीने...; HCचे निरीक्षण

न्या. अनुजा प्रभुदेसाई आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. पोलिसांनी लाऊडस्पीकर लावण्याबाबत असलेल्या निर्देशांचे पालन करुन योग्य ती अमंलबजावणी करावी असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

यापूर्वी रिचर्ड यांनी सन 2017 मध्ये याबाबत याचिका केली होती. त्यानंतर पुन्हा अवमान याचिका केली होती. पोलिसांनी तेव्हा लाऊडस्पीकर हटविण्याची कारवाई केली होती. मात्र मागील वर्षी पुन्हा लाऊडस्पीकर लावण्यात आले असा आरोप त्यांनी केला होता. या परीसरात एक रुग्णालय आहे आणि शांतता क्षेत्रात हा भाग येतो, असे याचिकेवर म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com