Mumbai Crime : वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला मोटारगाडीची धडक, हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

कुर्ल्यातील एल.बी.एल. मार्गावर वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मोटारगाडीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वाहतूक पोलिस गंभीर जखमी झाल्याची घटना आली समोर.
accident
accidentsakal

मुंबई - कुर्ल्यातील एल.बी.एल. मार्गावर वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मोटारगाडीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वाहतूक पोलिस गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटरगाडीचालकाला पोलीस हवालदार लक्ष्मण मोजर थांबण्याचा प्रयत्न करत होते.

मात्र चारचाकी चालकाने गाडीचा वेग वाढवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाने पोलिसाला धडक दिली. अपघातानंतर चालक तेथेच गाडी सोडून पळून गेला. त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार लक्ष्मण मोजर कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत आहेत. मोजर मंगळवारी कुर्ला येथील एल.बी.एस. मार्गावर वाहतुकीचे नियमन करीत होते. तेथे वाहनचालक नियमभंग करीत पूर्ण वळण घेऊन घाटकोपरच्या दिशेला जाण्याच्या प्रयत्नात होता. मोजर यांनी त्याला मोटारगाडी थांबवण्याचा इशारा दिला. सुरुवातीला मोटारगाडीचा वेग कमी होता.

पण मोजर यांनी थांबण्याचा इशारा देताच चालकाने मोटारगाडीची गती वाढवली व थेट मोजर यांना धडक दिली. त्यानंतर मोजर जमिनीवर कोसळले. अपघात झाल्यानंतर चालकाने चारचाकी सोडून पळ काढला. अपघातानंतर मोजर यांना तातडीने भाभा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपी चालकाची ओळख पटवली जात असल्याची पोलीसांकडून माहिती मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com