नवी मुंबई : मतांच्या वाणासाठी हळदी-कुंकवाचा थाट; मतदारांशी 'इमोशनल बाँडिंग'

Haldi Kumkum ceremony
Haldi Kumkum ceremonysakal media

वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे (Navi mumbai municipal corporation election) बिगुल वाजू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आपल्या पदरात मतांचा जोगवा पाडण्यासाठी नानाविध शक्कल लढवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अनेक इच्छुक उमेदवारांनी (Interested candidates) हळदी-कुंकवाच्या समारंभातून (Haldi Kumkum ceremony) महिलांकडून मतांचे वाण आपल्याला कसे मिळेल, याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी शहरात अजूनही महिला मतदारांना खूश करण्यासाठी हळदी-कुंकवाचा समारंभ उत्साहात सुरू आहे.

Haldi Kumkum ceremony
नारिकांनो पाणी जपून वापरा; मिरा-भाईंदरचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेची सोडत पार पडली आहे. यासाठी हरकती व सूचनाही मागवण्यात आल्या. मतदार याद्याही जाहीर झाल्याने आरक्षण सोडतीनंतर कोणत्याही क्षणी पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत तिकिट आणि मतांचे दान पदरात पाडण्याचा प्रयत्न शहरामध्ये अनेक दिवसांपासून दिसून येत आहे. मतदारांशी 'इमोशनल बाँडिंग' करून त्यांच्या नजरेत आपली प्रतिमा उंचावण्यासाठी इच्छुक उमेदवार हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करत आहेत.

कोरोनामुळे ५० पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येता येत नव्हते; पण आता निर्बंध शिथिल झाल्यामुळे राजकीय कार्यक्रम बिनधास्त होऊ लागले आहेत. हळदी-कुंकू समारंभ हा रथ सप्तमीपर्यंत असतानाही महिला मतदारांना खूश करण्यासाठी तो अजूनही शहरामध्ये उत्साहात सुरू आहे. केवळ इच्छुक उमेदवारच नाही, तर माजी नगरसेविका आणि नगरसेवक यांनीही हळदी-कुंकू समारंभाचा घाट घातला आहे. हळदी-कुकवाच्या कार्यक्रमात राजकीय नेते हजेरी लावत असून भाषणे ठोकत आहेत. उमेदवाराला मतांचा जोगवा मागण्याचे काम करत आहे.

भेटवस्तूंची लूट

हळदी-कुंकू आणि तीळगुळाच्या वाटपाबरोबरच संक्रांतीला महत्त्व असते ते भेटवस्तू लुटण्याचे. या संधीचे सोने करत भेटवस्तूंची लूटही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याचप्रमाणे लकी ड्रॉ काढून महिलांना भेटवस्तू देण्याचे प्रकारही सुरू आहेत. नॉनस्टिक भांड्यांपासून पूजेच्या साहित्यापर्यंतच्या भेटवस्तूंनी हळदी-कुंकू समारंभ गाजत आहे. ताम्हण, चांदीचे पूजा साहित्य, प्लास्टिकचे डबे, साड्या, ताट, वाट्या अशा उपयोगी असणाऱ्या वस्तूंचा यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com