लोकल सुरु करण्याबाबत राज्य आणि रेल्वेत एकमत नाही, दोघांच्या असहमतीत मुंबईकरांची गळचेपी

लोकल सुरु करण्याबाबत राज्य आणि रेल्वेत एकमत नाही, दोघांच्या असहमतीत मुंबईकरांची गळचेपी

मुंबई : मुंबईत अनलॉकमध्ये एकीकडे ऑफिसेस पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ऑफिसेसनी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊनच काम करावं असं सांगायला आणि त्याचा अवलंब करायला सुरवात झालीये. मात्र मुंबईकर ज्या मुंबई लोकलमधून आपल्या कार्यालयात पोहोचायचे ती मुंबईची लाईफ लाइन अजूनही बंद आहे. आधी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी रेल्वे QR कोड देऊन रेल्वे सेवा सुरु केली. त्यानंतर महिलांना लोकलमधून प्रवासास मुभा देण्यात आली. मात्र सर्वसामान्य पुरुष प्रवाशांसाठी मुंबई लोकल रेल्वेचे दरवाजे अजूनही बंद आहेत. तब्बल ऐंशी लाख प्रवासी लोकल सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्याकडून रेल्वेला सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे सुरु करण्याचा प्रस्ताव देखील पाठवणात आलाय. कशा प्रकारे रेल्वे सेवा सुरु करण्याचा सरकारचा प्लॅन आहे तो देखील रेल्वेला पाठवण्यात आलेला आहे. मात्र, एकीकडे सामान्य मुंबईकर रेल्वे कधी सुरु होणार याची चातकासारखी वाट पाहतोय तर दुसरीकडे राज्य सरकार विरुद्ध रेल्वे प्रशासन यांच्यातील राजकारण मात्र अद्यापही सुरूच असल्याची बाब पुन्हा एकदा समोर येतेय. 

सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे लोकल सुरु केल्यांनतर होणारी गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असं मत रेल्वेने मांडलंय. दरम्यान रेल्वेच्या या भूमिकेवर राज्य सरकार सहमत नसल्याची बाब देखील सूत्रांकडून समोर येतेय. तसेच कोरोना काळात सर्व खबरदारी बाळगून ८० लाखांऐवजी केवळ २२ लाख प्रवाशाची वाहतूक करण्यास रेल्वे प्रशासन तयार आहे. त्यामुळे राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेण्यात येण्याची शक्यता आहे. 

राज्याने जो प्रस्ताव रेल्वेला पाठवला होता त्यानुसार वेगवेगळ्या वेळेनुसार सर्वांना रेल्वेत परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली. यावर विचार करून रेल्वेला राज्य सरकारला अभिप्राय दयायचा होता. ज्यावर विचार करून रेल्वेने सरकारला कळवलं की सर्वांना एंट्री द्यायची असल्यास एखादे ऍप किंवा तंत्रज्ञान वापरावे लागेल, जेणे करून रेल्वे स्टेशनवर होणारी गर्दी नियंत्रणात आणता येतील. 

रेल्वेच्या या अभिप्रायाला राज्य सरकारकडून अद्याप कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही. दरम्यान राज्य सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार हे करणं अतिशय अवघड आहे. याबाबतचा सर्व डेटा हा रेल्वेकडे आहे.त्यामुळे रेल्वेने याबाबत विचार करायला हवा होता. सोबतच रेल्वेचं असंही म्हणणं आहे की, एका लोकलमधून केवळ ७०० प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली जाऊ शकते. त्यामुळे पूर्ण क्षमतेने जरी लोकल चालवल्या तरीही २० ते २२ लाख प्रवासीच लोकलमधून प्रवास करू शकतात तेवढ्यानंच आम्ही परवानगी देऊ शकतो. सध्याच्या घडीला मुंबईत एका दिवसात तब्बल ८० लाख प्रवासी प्रवास करत असतात. एका मराठी वृत्तवाहिनेने ही सावितर बातमी दिलेली आहे. 

politics between railway and state resulting in headache of common mumbaikar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com