Rajendra Kshirsagar : मतदान केंद्रे महिला, दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी सुविधांसह सज्ज; जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी घेतला आढावा
Rajendra Kshirsagar
Rajendra Kshirsagaresakal

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मुंबई उत्तरपूर्व लोकसभा मतदारसंघाच्या विक्रोळी येथील पिरोजशहा सांस्कृतिक सभागृहातील कार्यालयास भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला असतामहिला, दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी सुविधांसह सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले .अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, सहायक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे, नायब तहसीलदार महेश पाटील उपस्थित होते.

Rajendra Kshirsagar
IPO News Update : आधार हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठीचा प्राइस बँड निश्चित ; ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची घोडदौड

क्षीरसागर. यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीपच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व विशेष उपाययोजना, मतदार जनजागृती कार्यक्रम, मतदान केंद्रे, कर्मचारी प्रशिक्षण, कायदा-सुव्यवस्था, खर्च सनियंत्रण, आपात्कालीन परिस्थतीत केलेल्या नियोजनाबाबत त्यांनी आढावा घेतला. मुंबई उत्तर पूर्व कार्यालय मतदारांसाठी सुविधांसह सज्ज असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

Rajendra Kshirsagar
Chakan News : चाकण नगर परिषदेला हक्काची जागा कधी मिळणार ?

मुंबई उपनगर येथे २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पूर्व नियोजनासह मुंबई उत्तर पूर्व कार्यालय सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली.

Rajendra Kshirsagar
Nashik News : रोहयो मजुरांचे थकीत 15 कोटी अखेर मिळाले

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात एकूण १६,३६,८९० मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदार ८७७८५५ तर महिला ७५८७९९, तृतीयपंथी २३६ मतदार आहेत. यापैकी नवमतदार पुरुष १०६१९, नवमतदार महिला ७८८८ असे एकूण नवमतदार १८ हजार ५०७ आहेत. दिव्यांग पुरुष मतदार १८२१ तर महिला दिव्यांग मतदार १३३९, दिव्यांग तृतीयपंथी एक असे एकूण ३१६१ दिव्यांग मतदार आहेत. तर, १४५५० ज्येष्ठ मतदार आहेत.

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात १६८१ मतदान केंद्रे सर्व सुविधा सह सज्ज असून, विशेष बस सेवा, दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी विशेष रांग असणार आहे. महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच पाणी आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com