महालक्ष्मी रेसकोर्सवरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता; BMC च्या महासभेत एक जूना प्रस्ताव पुन्हा चर्चेत

समीर सुर्वे
Sunday, 27 September 2020

महालक्ष्मी येथील रेसकोर्स वरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता. महापालिकेच्या महासभेत रेसकोर्सबाबतचा एक जूना एक प्रस्ताव चर्चेसाठी आला आहे.

मुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्स वरुन पुन्हा चर्चेचे घोडे उधळण्याची शक्यता. महापालिकेच्या महासभेत रेसकोर्सबाबतचा एक जूना एक प्रस्ताव चर्चेसाठी आला आहे. त्यावरुन पुन्हा रेसकोर्सवरील थिम पार्कला उजाळा मिळण्याची शक्यता आहे.

'सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशीचे थेट प्रक्षेपण, आयपीएल प्रमाणेच हक्कांचा लिलाव करा'; सचिन सावंत यांचा भाजपला टोला

महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या भुखंडाचा भाडेकरार 2013 मध्ये संपल्यानंतर शिवसेनेने या ठिकाणी थिम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी हा भुखंड ताब्यात घेेेेेेेेण्याचा ठराव महासभेत करुन राज्य सरकारकडे पाठवला होता.मात्र,राज्य सरकारने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही.महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर रेसकोर्सच्या जागेवर थिम पार्क बरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय तयार करण्याचाही विचार पुढे आला होता.

पालिकेच्या मक्ता कराराचा भंग केल्या बद्दल रेसकॉर्सची जबाबदारी असलेल्या रॉयलवेस्टर्न क्लबवर कारवाई करण्याचा महापालिकेचा 2004 च्या ठरावावर प्रशासनाकडून अहवाल सादर करण्यात आला आहे.त्यामुळे रेसकोर्सचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

'कुठलाही भाग न वगळता मुलाखत प्रसिद्ध करण्यात यावी'; भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

महापालिकेने रेसकोसर्सचा भुखंड रॉयल वेस्टर्न क्लबला भाड्याने दिला आहे. मात्र, या 8 लाख 55 हजार चौरस मिटर भुखंडा पैकी 5 लाख 96 हजार चौरस मिटरचा भुखंड राज्य सरकारच्या मालकीचा आहे.त्यामुळे 2013 मध्ये पालिकेने हा ठराव राज्य सरकारकडे पाठवला होता.त्यातच, 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेसकोर्ससाठी स्वतंत्र धोरण ठरविण्याचा निर्णय घेतला होता.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The possibility of rediscussing horses from the Mahalakshmi racecourse