
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये गेल्या महिन्याभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा थेट परिणाम शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांवर होत असून वीज नसल्याने अनेकदा उपचारात अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे संतापलेल्या माजी नगरसेवकांनी आज महावितरणाच्या अधिकाऱ्यांना गुलाबाचे फुल व निवेदन पत्र देऊन निषेध व्यक्त केला. तसेच आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला.