esakal | रिमोटच्या साह्याने सहा कोटींची वीज चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

रिमोटच्या साह्याने सहा कोटींची वीज चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वसई : महावितरणच्या (MSEB) भरारी पथकाने एका ग्लास कंपनीवर(company) छापा टाकला असून, यात कारखानदाराने रिमोटच्या (Remote) साह्याने सहा कोटींची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. याबाबत चौघांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे महावितरणने सांगितले.

वसई पूर्वेकडील कामेण येथे अमाफ ग्लास टफ नावाची कंपनी आहे. येथे विजेचा वापर करणारे अब्दुल्ला आझाद हुजेफा, शब्बीर आसिर हुजेका, जागामालक प्रफुल्ल गजानन लोखंडे व वीजचोरीची यंत्रणा बसवून देणारी व्यक्ती यांचा समावेश आहे, भरारी पथकाने वीजभार तपासला असता त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल सापडला.

हेही वाचा: काळ्या रंगाच्या बँगेतून घेऊन चालला होता, पोलिसांनी तपासणी करताच...

१२ टक्का यांज वापरात घट होते असे आल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला. या कारखान्याने सहा कोटी १७ लाख ७१ हजार ३३० रुपये किमतीची ३३ लाख सहा हजार ४९५ युनिट विजेची चोरी केल्यावावत वाशी भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक सूर्यकांत पानतावणे यांनी तक्रार दिली. महावितरणच्या असा होतो

रिमोटचा वापर

रिमोट कंट्रोलचे सर्किट एका पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक स्वीच बोर्डमध्ये निळ्या, काळ्या व लाल टेपमध्ये लपवलेले होते. मीटरच्या बाहेरील बाजूस रिमोट कंट्रोल सर्किट बसवून हा फेरफार केला जात होता.

loading image
go to top