

Pradeep Purnekar Case
ESakal
ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या वेळी झाडलेली एखादी गोळी आरोपीलाही लागली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे नवा ट्विस्ट समोर येत आहे, मात्र गोळी नेमकी कोणाला लागली, त्या जखमी झालेल्याने कुठे उपचार घेतले. या संदर्भात ठाणे-मुंबई तसेच आजूबाजूच्या रुग्णालयातील नोंदी तपासण्याचे कामही पोलिसांकडून केले जात आहे.