ठाणे : ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्याकांड प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेप्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. .या हत्याकांडातील आरोपी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचे पती राजा शिंदे यांना अटक करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी प्रदीप पूर्णेकर यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांनी केली आहे. या मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले जाणार होते, मात्र त्याआधीच राम पूर्णेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे..शेतकऱ्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोझर! मुरबाडमधील कारवाईप्रकरणी नागरिकांचा संताप; तहसीलदारांकडे निवेदन.मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली असून काही संशयितांची चौकशी सुरू आहे. .प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २७ दिवस उलटल्यानंतरही सूत्रधारांना अटक न झाल्यामुळे राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यापूर्वीच ठाणे पोलिसांनी राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले..Mumbai News: वर्सोवा-वांद्रे सेतूला २०२८चा मुहूर्त! कोविड, कंत्राटदारातील बदल, कामाच्या व्याप्तीमुळे कामाला विलंब.ठाणे पोलिसांकडून राम पूर्णेकर यांना बळजबरीने रिक्षात कोंबून ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ताब्यात घेत असताना राम पूर्णेकर यांच्या आसवांचा बांध फुटला. पोलीस रॅम पूर्णेकर यांना ताब्यात घेत असताना ते रिक्षात बसायला तयार नव्हते. मात्र, पोलीस त्यांची समजूत काढत होते. यावेळी एकी पोलीस अधिकारी त्यांना 'राम माझं ऐक, माझ्यावर विश्वास ठेव, रिक्षात बस' असे सांगत आहेत. तर त्यावर 'सर माझे वडील गेलेत' असे राम पूर्णेकर म्हणत ते मोठमोठ्याने रडत होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.