

Pradeep Purnekar Case
ESakal
ठाणे : शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात आता त्यांच्या कुटुंबीयांनी तपासाच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन महिने उलटूनही तपास कुठपर्यंत पोहोचला याबाबतची स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रदीप पूर्णेकर यांची पत्नी विजेता यांनी शनिवारी (ता. २८) ठाणे पोलिसांकडे उपलब्ध पुरावे सादर केले. तसेच माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर आपण ठाम असून, न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.