

ST Solar power Project
ESakal
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) मोकळ्या जागांवर तसेच कार्यशाळा आणि बसस्थानकांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून दरवर्षी सुमारे ३०० मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. वर्षाकाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या वीजनिर्मितीचे हे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाद्वारे एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा मानस असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.