esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

छायाचित्रणातून भावंडांची उंच भरारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ज्ञान (Education) दिल्याने वाढते, असे नेहमीच ज्ञा बोलले जाते. वसईतील तामतलाव येथे राहणाऱ्या प्रवीण, देवेंद्र व महेश दांडेकर (Mahesh Dandekar) यांनी या उक्तीला प्रत्यक्षात आणले आहे. २३ जुलै १९८९ मध्ये प्रवीण दांडेकर (Pravin Dandekar) यांनी रहेजा महाविद्यालयात शिक्षण घेताना पहिला रोल कॅमेरा घेतला.

सध्या ते वसई तालुका फोटोग्राफर असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचे दोन बंधूदेखील याच क्षेत्रात आहेत. रोलमधून येणारी निगेटिव्ह असो, की आताचा डिजिटल कॅमेरा हाताळताना त्यांची दूरदृष्टी, नेमके कसे टिपायचे यात दांडेकरांचा असलेला हातखंडा अनेकांना भुरळ घालतो.

दांडेकर यांनी वसईत कार्यशाळा सुरू केली. यात अनेक विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. यातून २५ ते ३० जण व्यावसायिक म्हणून काम करत आहेत. युरोप खंडात, अमेरिकेसह विविध देशांत त्यांचे विद्यार्थी आज अव्वल स्थानावर आहेत. अनेकांना शिक्षण घ्यायचे असते, मात्र महागडा कॅमेरा अथवा शुल्क देण्यासारखी परिस्थिती नसते; त्यामुळे त्यांना छायाचित्रणाचे मोफत प्रशिक्षण देत आहोत. असे प्रवीण व देवेंद्र दांडेकर सांगतात.

हेही वाचा: पिंपरी : ‘ऑनलाइन’बाबत शिक्षकांना प्रशिक्षण

आम्ही तिघा भावंडांनी रोल कॅमेऱ्यापासून छायाचित्रणाचा प्रवास सुरू केला. सध्या डिजिटल जमाना असला, तरीदेखील उत्तम प्रतीच्या कॅमेऱ्यातून छायाचित्रे असावीत, ही मागणी असते. ही कला आमच्यापुरतीच मर्यादित न ठेवता अनेकांना विनामूल्य प्रशिक्षण दिले आणि विद्यार्थ्यांनी त्याचे चीजही केले. अनेक जण परदेशात छायाचित्रण करतात, याचे आम्हाला समाधान आहे.

प्रवीण दांडेकर, अध्यक्ष, वसई तालुका फोटोग्राफर असोसिएशन

loading image
go to top