
मुंबई : राज्यात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली मुंबईला आकार दिला जात असून, येत्या ५-१० वर्षांमध्ये मुंबईप्रमाणेच चांदिवलीचा चेहरामोहराही महायुती बदलेल, असा विश्वास भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. चांदिवलीच्या प्रभाग क्रमांक १५७ चे माजी नगरसेवक भाजपचे ईश्वर तायडे यांच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम आणि भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी दरेकर बोलत होते.