रुग्णालये हाऊसफुल; उपचाराअभावी कोरोनाबाधित गर्भवती महिलेची परवड  

pregnant-woman
pregnant-woman

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधित नऊ महिन्यांची गर्भवती स्वत:ला रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंती आरोग्य अधिकाऱ्यांना करीत आहे; मात्र कोरोना रुग्णांमुळे रुग्णालये पूर्णपणे भरली असल्याने तिला रुग्णालयात जागाच मिळाली नाही. गेल्या चार दिवसांपासून तिच्यासह बाधित कुटुंबाची मुंबईत वणवण सुरू आहे. 

चेंबूरच्या माहुलरोड वाशीनाका येथे शास्त्री नगर बाबडीच्या बाजूला असलेल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये हे कुटुंब राहते. गेल्या शनिवारी कुटुंबातील गर्भवती महिलेची जवळील अयोध्यानगर येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली.  त्यावेळी डॉक्टरांनी त्या महिलेसह सर्व कुटुंबाची कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. त्यांची त्याच दिवशी कोरोनाची चाचणी दिली. त्याचा अहवाल सोमवारी आला. त्यात गर्भवती महिलेसह तिचा पती आणि भाचीसह तिघे पॉझिटीव्ह आले आणि त्यांच्या पायाखालची वाळूचा सरकली. 

चार दिवस या कुटुंबातील बाधित असलेल्या तिघांवर कोणताही उपचार झाला नाही. गर्भवती महिलेसह तिघांनाही ताप, डोकेदुखी, खोकल्याचा त्रास होत आहे. त्यांच्यावर कोणताही उपचार झाला नसल्याने त्यांचा आजार बळावत चालला आहे. गर्भवतीचे प्रचंड हाल होत आहेत. महिलेचा सहा वर्षांचा त्याचा मुलगा मात्र निगेटिव्ह आहे. 

नायर रुग्णालयात पाठवणार
महिला राहत असलेल्या भागातील शताब्दी आणि राजावाडी ही दोन रुग्णालये भरली आहेत. तेथे जागा नसल्याने या बाधित कुटुंबाला आता नायर रुग्णालय पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.  तसेच, यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधितांना तात्काळ कारवाई करण्यास सांगतो, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com