Elections in Mumbai : लोकशाहीच्या उत्सवासाठी यंत्रणा सज्ज

Election Duty : आवश्यक साहित्यासह कर्मचारी रवाना; आज दोन हजार ५६६ केंद्रांवर मतदान
पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त ठिकाणांहून मतदान केंद्रांसाठीचे साहित्य वितरण रविवारी (ता. १२) सकाळी आठपासून सुरू झाले.
पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त ठिकाणांहून मतदान केंद्रांसाठीचे साहित्य वितरण रविवारी (ता. १२) सकाळी आठपासून सुरू झाले. esakal

Lok Sabha Election 2024 : एरव्ही साप्ताहिक सुटीचा दिवस मनासारखा व्यतीत करणाऱ्या शिक्षक, सरकारी कर्मचाऱ्यांचा रविवार (ता. १२) आगळावेगळा ठरला. सर्व जण सकाळी सातपासूनच ड्युटीवर आले. तेही एक दिवसाच्या मुक्कामाच्या तयारीने. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता, लोकशाहीच्या उत्सवाचा! कारण, दैनंदिन कामाऐवजी ते लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर जाणार होते.

पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त ठिकाणांहून मतदान केंद्रांसाठीचे साहित्य वितरण रविवारी (ता. १२) सकाळी आठपासून सुरू झाले.
Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

स्वतःची हजेरी लावून आणि निवडणूक साहित्य ताब्यात घेऊन मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणाऱ्या बसमध्ये हे सर्व जण बसले. साधारण, दुपारी दोनपर्यंत सर्व वाहने मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना घेऊन रवाना झाली.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. १३) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यातील पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त ठिकाणांहून मतदान केंद्रांसाठीचे साहित्य वितरण रविवारी (ता. १२) सकाळी आठपासून सुरू झाले.

ते घेऊन मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले. त्यापूर्वी त्यांना तिसरे व अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

त्यांना दिलेल्या मतदान साहित्यामध्ये विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह प्रथमोपचार पेटी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र आदींचा समावेश होता. त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी पीएमपी बस, जीप व इतर वाहनांची व्यवस्था केली होती.

पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त ठिकाणांहून मतदान केंद्रांसाठीचे साहित्य वितरण रविवारी (ता. १२) सकाळी आठपासून सुरू झाले.
Mumbai Loksabha Election : मुंबईच्या मैदानात मोदी व केजरीवाल

पनवेल : ए. आर. कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथून ५४४ मतदान केंद्रांसाठी २७ टेबलांद्वारे साहित्य वितरण झाले. तीन हजार ४०० अधिकारी-कर्मचारी व एक हजार २०० पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी ८६ एसटी बस, १५ मिनी बस, २० जीप, चार ईव्हीएम कंटेनर अशा १२५ वाहनांची व्यवस्था होती.

कर्जत : पोलिस मैदान येथून ३३९ मतदान केंद्रांच्या साहित्य वितरणासाठी ४७ टेबले ठेवण्यात आली होती. त्यासाठी १४१ कर्मचारी नियुक्त केले होते. दीड हजार मतदान कर्मचारी नियुक्त केले आहेत. एक हजार २२० बॅलेट युनिट, ४६७ कंट्रोल युनिट आणि ४९१ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप केले. वाहतुकीसाठी ४३ एसटी बस, २१ मिनी बस, आठ जीप, सहा ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

उरण : जासई येथील डी. बी. पाटील मंगल कार्यालयातून ३४४ मतदान केंद्रांवर २५ टेबलांद्वारे मतदान साहित्य वाटप झाले. त्यासाठी १०० कर्मचारी नियुक्त केले होते. एक हजार ५२० अधिकारी, कर्मचारी नियुक्त आहेत. एक हजार २३८ बॅलेट युनिट, ४७४ कंट्रोल युनिट आणि ४९८ व्हीव्हीपॅट, मतदान अधिकारी व कर्मचारी आणि ४१ एसटी बस, २२ मिनी बस, २८ जीप, चार ईव्हीएम कंटेनर आणि एक बोट अशी ९६ वाहने होती.

मावळ : तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेज येथून ४५ टेबलांद्वारे ३९० मतदान केंद्रांवर मतदान साहित्य वाटप झाले. एक हजार ८०२ मतदान अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांना एक हजार ४०४ बॅलेट युनिट, ५५३ कंट्रोल युनिट आणि ५९२ व्हीव्हीपॅटचे वाटप झाले. मतदान केंद्रांवर जाण्यासाठी ४९ एसटी बस, २७ मिनी बस, २० जीप, तीन ईव्हीएम कंटेनर अशी ९९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली.

चिंचवड : महापालिकेच्या थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथून ५४९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्य वितरणासाठी ४८ टेबल्स होते. दोन हजार ४३६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एक हजार ९७६ बॅलेट युनिट, ७७९ कंट्रोल युनिट आणि ८३९ व्हीव्हीपॅटसह मतदान केंद्रांवर जाण्यासाठी १०२ पीएमपी बस, २० मिनी बस, १६ जीप, ईव्हीएम कंटेनर अशी १४२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिंपरी : ऑटो क्लस्टर येथून ४०० मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्य वितरणासाठी १६ टेबल होते. १२७ कर्मचारी आणि १० समन्वय अधिकारी नियुक्त होते. एक हजार ७७६ मतदान अधिकारी-कर्मचारी आणि एक हजार ४४० बॅलेट युनिट, ५६८ कंट्रोल युनिट आणि ६०८ व्हीव्हीपॅट मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी ७३ पीएमपी बस, एक जीप, चार ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था होती.

पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त ठिकाणांहून मतदान केंद्रांसाठीचे साहित्य वितरण रविवारी (ता. १२) सकाळी आठपासून सुरू झाले.
Mumbai Lok Sabha Election : मतदात्यांसाठी मतदान केंद्रावर थंडा थंडा कूल कूलची व्यवस्था!

मावळ लोकसभा मतदारसंघ

एकूण मतदार : २५,८५,०१८

मतदान केंद्र : २,५६६

बॅलेट युनिट : ९,२३६

कंट्रोल युनिट : ३,५९१

व्हीव्हीपॅट यंत्र : ३,८१६

मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यातील मतदान केंद्रांवर मतदानासाठीच्या आवश्यक साहित्याचे वितरण रविवारी झाले. सर्व पथके मतदान केंद्रांवर पोहोचली आहेत. सोमवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे बालेवाडी क्रीडा संकुलात नेली जाणार आहेत. तिथेच मतमोजणी होईल.

- दीपक सिंगला, निवडणूक निर्णय अधिकारी, मावळ

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गेल्या वेळी ज्या ठिकाणी कमी मतदान झाले त्या ठिकाणी समक्ष जाऊन जनजागृती करण्यात आली आहे. तापमान जास्त असल्याने मतदारांनी सकाळी सात ते नऊ व सायंकाळी चार ते सहा वाजता मतदान करावे.

- राहुल मुंडके, सहायक निवडणूक निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com