Presidential Election 2022 : मोठी बातमी! 'काँग्रेस-राष्ट्रवादी'ची मते फुटली?

द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून १८५ ते १९० मते मिळतील
Presidential Election 2022  nda candidate draupadi murmu will get record break votes from maharashtra says bjp leader
Presidential Election 2022 nda candidate draupadi murmu will get record break votes from maharashtra says bjp leadersakal

मुंबई : द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून १८५ ते १९० मते मिळतील, असा अंदाज आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वादर्शक ठरावावेळी १६४ आमदारांची मते मिळाली होती. ही मतसंख्या केवळ काही दिवसांत तब्बल २० मतांनी वाढण्याची शक्यता आहे. भाजपची सातत्याने सुरू असलेली घोडदौड बघता नुकतेच विरोधी बाकांवर फेकल्या गेलेल्या आमदारांनी मतपेटीतून संदेश पाठवायचे ठरवले आहे. त्याची यथायोग्य दखल घेत योग्य वेळी स्वागत करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिल्याचे सांगण्यात येते आहे.

शिंदे गटाने भाजपला पाठिंबा द्यायची तयारी सुरू केली होती तेव्हाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही शिजत असल्याच्या चर्चांना जोर आला होता. राज्यसभा, विधान परिषद आणि पाठोपाठ सरकारबदलामुळे झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे-फडणवीस यांनी उत्तम संख्याबळ संपादित केले. आता काँग्रेसमधील काही आमदार आपले मत कमळदलाचरणी अर्पण करायला सरसावले आहेत, असे विश्वसनीयरीत्या समजते. काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता असल्याने विधान परिषदेत त्यांनी दाखल केलेले उमेदवार चंद्रकांत हंडोरे पडले. दलित असूनही त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. काँग्रेसचा परंपरागत मतदार त्यामुळे नाराज झाला आहे; मात्र आमदार स्वत:च्याच मर्जीचे मालक असल्याप्रमाणे वागत असल्याने काँग्रेसने अद्याप मते का फुटली हे विचारणाऱ्यांना नोटिशी बजावलेल्या नाहीत. सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला खाशा स्वाऱ्या गैरहजर राहिल्या. त्यांना उशीर का झाला हे विचारणारी नोटीस पाठवण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती, अद्याप ती प्रत्यक्षात आलेली नाही.

मतांची गोळाबेरीज

काँग्रेसची किती मते मुर्मू यांना मिळतील, असे विचारले असता एका ज्येष्ठ नेत्याने सरळ उत्तर न देता राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही मते मिळतील की, असे उत्तर दिले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील मतेही आम्हाला मिळतील, असा विश्वासही या नेत्याने व्यक्त केला. काँग्रेसची विदर्भ मराठवाड्यातील लक्षणीय संख्येतील मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील एखादे मत फुटणार असल्याचे बोलले जात होते. ठाकरे गटातील ज्यांना यायचे आहे, त्यांनी मत द्यावे असा निरोप शिंदे गटाने दिला होता. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मते फुटण्याची शक्यता फेटाळून लावली; मात्र तसे झाले असल्यास सक्त कारवाई केली जाईल, असे आमदारांना सांगितल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीने एकही मत फुटणार नाही असा दावा केला.

समर्थन वाढेल : फडणवीस

महाराष्ट्रातील ७० टक्के आमदारांची मते द्रौपदी मुर्मू यांना मिळणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. ही संख्या २०० च्या वर जाते. मुख्यमंत्री शिंदे यांनीही तसेच सांगितले आहे; मात्र या वेळी मुर्मूंचा विजय निश्चित असल्याने असावे, पण मते फिरवण्यात वाक्‌बगार असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्ती पणाला लावली नाही असे सांगितले जाते. माध्यमांशी बोलताना या निवडणुकीत गुप्त मतदान केले जाते, ते सद्सद्विवेक बुद्धिला स्मरून मतदान केले जाईल. आमदारांचे समर्थन वाढेल असे विधान मात्र फडणवीस यांनी केले होते. २०० मते मिळाली तर त्यामागची व्यूहरचना शिंदेची की फडणवीसांची, असा प्रश्न निर्माण होणार हे मात्र निश्चित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com