esakal | उरणमध्ये कोरोनाला थोपवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु, सर्वेक्षण होणार
sakal

बोलून बातमी शोधा

uran

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनानुसार उरण तालुक्यात गावनिहाय व वॅार्डनिहाय सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.

उरणमध्ये कोरोनाला थोपवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु, सर्वेक्षण होणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उरण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनानुसार उरण तालुक्यात गावनिहाय व वॅार्डनिहाय सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात 60 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्ती, गर्भवती, कर्करोग, डायलिसीसवरील रुग्ण, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग, कुष्ठरोग व हृदयरोग, अस्थमा यासारख्या गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींची नाव, गाव, मोबाईल क्रमांक याबाबतची माहिती गोळा करून सर्वेक्षण करण्यात येत आहे.

हे ही वाचा : रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...

उरण पालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाचे नोडल अधिकारी अनिल जगधनी आहेत. या उपक्रमात सुमारे 25 कर्मचारी काम करीत आहेत. यासाठी नगराध्यक्षा सायली म्हात्रे,  उरण पालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, आरोग्य सभापती रजनी कोळी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य निरीक्षक महेश लवटे, कामगारांचे सहकार्य मिळत आहे.

महत्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर 'इतका' वाढला

यासाठी प्रशासनाने नेमलेले कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वे करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.

Preventive measures to prevent corona in Uran will be launched 

loading image