Narendra Modi Mumbai Visit : "डबल इंजिन सरकार नव्हते तेव्हा..." ; नरेंद्र मोदी यांची ठाकरे सरकारवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Mumbai Visit

Narendra Modi Mumbai Visit : "डबल इंजिन सरकार नव्हते तेव्हा..." ; नरेंद्र मोदी यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर होते. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात ३८ हजार ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यानंतर बीकेसी मैदानावर सभा झाली या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला संबोधित केले. 

नरेंद्र मोदी यांनी मुंबई टार्गेट ठेवत आपल्या भाषणाला सुरवात  केली. मुंबईत केलेल्या कामाचा त्यांनी पाढा वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची मेट्रो, छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आधुनिकीकरण, रस्ते सुधारणेचा मोठा प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रुग्णालये, हे मुंबई शहर सुधारण्यात मोठी भूमिका बजावणार आहे. 

विकासाचा पैसा योग्य ठीकाणी लागला पाहीजे. मुंबईच्या विकासासाठी पैसा कमी नाही. राजकीय स्वार्थासाठी विकासाला कधीही ब्रेक दिला नाही पण यापूर्वी हे पाहायला मिळालं, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर केली. 

हेही वाचा: Narendra Modi Mumbai Visit : मोदींना हसू आवरेना; मुख्यमंत्री शिंदेंचा 'दावोस'मधला 'तो' किस्सा काय?

दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार पाहीजे. डबल इंजिन सरकार नव्हते तेव्हा कामात अडथळे निर्माण करण्यात आले. मुंबईच्या विकासासाठी शहरात समर्पित प्रशासन असेल तर विकास वेगानं होतो, असे म्हणत मुंबईत मोदींनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. एकत्रित मिळून मुंबईचा विकास करु, असे मोदी म्हणाले. 

हेही वाचा: PM Modi Mumbai Visit : मुंबईवर २० वर्ष राज्य करणाऱ्यांनी स्वतःचे फिक्स्ड डिपॉझीट केले; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभ येथे झाला. हे सर्व मुंबई शहरासाठी अधिक चांगले सिद्ध होणार आहेत. मी सर्व लाभार्थी आणि मुंबईतील रहिवाशांचे अभिनंदन करतो.

हेही वाचा: PM Modi visit to Mumbai: पूर्वी आपण कसंबसं भागवत होतो, आज मोठी स्वप्न पाहतोय; मोदींनी व्यक्त केला विश्वास