मुंबई लोकलबाबत सर्वात मोठी बातमी : लोकल सेवा पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर ?

कुलदीप घायवट
Wednesday, 17 February 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करा. मास्क वापरा, गर्दी टाळा,

मुंबई, ता. 17 : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू झाल्यामुळे कोरोना वाढला आहे, असा ठपका लोकल सेवेवर बसत आहे. प्रवासी विना मास्क घालून प्रवास करून, कोरोनाचे नियम न पाळता प्रवास करत आहेत. प्रवाशांवर दंडात्मक कारवाई, जनजागृती करण्यास यंत्रणा अपयशी पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे. 

महत्त्वाची बातमी : लोकलमधील गर्दीपाहून उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता, म्हणालेत "मोठी किंमत चुकवावी लागू शकते"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करा. मास्क वापरा, गर्दी टाळा, असे आवाहन केले. नागरिकांनी याचे पालन केले नाही. तर, पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असे ठाकरे म्हणाले होते. लोकल प्रवासात प्रवासी मास्क वापरण्यास कंटाळा करत आहेत. लोकलमध्ये धक्काबुक्की सहन करून 'गर्दी करू नका, सामायिक अंतर राखा' अशी उद्घोषणा ऐकून प्रवास होत आहे. त्यामुळे जानेवारीत दैनंदिन आकडेवारीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह दर सरासरी 3 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. पण, मागील सात दिवसांत तो पुन्हा 4.22 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास बंद आणि फक्त अत्यावसशक सेवेतील प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची मुभा दिली जाईल, अशी करण्याची चर्चा सुरू आहे. 

महत्त्वाची बातमी :  विलगीकरणातून प्रवासी पळाले; महापौरांनी सुरु केलं स्टिंग ऑपरेशन

सर्वसामान्य प्रवाशांसाठी ठराविक वेळेसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. यावेळी प्रवाशांकडून आंदोस्तव साजरा करण्यात आला. मात्र या जल्लोषात कोरोना विषाणू असल्याचे भान प्रवासी विसरून गेले. यासह यंत्रणेला ही कोरोना असल्याचे प्रवाशांच्या मनात ठसविल्यास कमी पडताना दिसून येत आहे. यंत्रणेला आलेली मरगळ प्रवाशांच्या शिथिलतेतून, कायदा न पाळण्यामधून दिसून येत आहे. त्यामुळे सुरू लोकल सेवा बंद झाल्यास प्रवाशांचे हाल होण्याची चिन्हे दिसून येतील.

दरम्यान, असा कोणताही प्रस्ताव नाही. प्रवाशांनी मास्क घालावा, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना आवाहन केले जात आहे. बरोबरच मास्क न घालणाऱ्या प्रवाशांनी विरोधात पालिकेच्या मदतीने कारवाई केली जात आहे, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

pro of central railways shivaji sutar on mumbai local train in increasing covid count


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pro of central railways shivaji sutar on mumbai local train in increasing covid count