
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने प्रथमच बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि पूनर्मूंल्याकनचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अर्ज करताना विद्यार्थी आणि पालकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी शिक्षण मंडळाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. या तक्रारींची दखल घेत मंडळाने संकेतस्थळावरील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर मंडळाने शुक्रवार (ता.17) पासून विद्यार्थांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार विद्यार्थांना विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. निकालानंतर अनेक विद्यार्थी गुणपडपळणी आणि छायाप्रत मिळविण्यासाठी अर्ज करत आहेत. पण विद्यार्थांना अर्ज करण्यात अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. अर्ज भरताना संकेतस्थळ ओपन ना होणे, शुल्क भरण्यास अडचण येऊ लागल्याने पालक त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी काही विद्यार्थी-पालकांनी राज्य शिक्षण मंडळाकडे तक्रार केली आहे. विद्याथ्यार्थांच्या तक्रारींनतर शिक्षण मंडळाने वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर विद्यार्थांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला.
गुणपडताळणी आणि पूनर्मूंल्यांकनासाठी यंदा प्रथमच
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली अाहे. सुरूवातील काही विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी आल्या. मात्र त्या तातडीने दूर करण्यात आल्या असून अर्ज भरण्याची प्रक्रिया अाता सुरळीत सुरू अाहे.
- शकुंतला काळे, अध्यक्ष,
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
---------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.