थकबाकीदारांनो! दवंडी पिटवूनही लक्षात येत नाही ना? आता कारवाई होणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

मुंबई : आर्थिक वर्ष समाप्ती जवळ आल्याने महापालिकेने मालमत्ता कर थकबाकी वसुल करण्यास सुरुवात केली आहे. जे थकबाकीदार भरणा करत नसतील, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. अशा थकबाकीदारांचे वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

संत गाडगे बाबांना भारतरत्न द्या! वाचा कोणी केलीये मागणी

मुंबई : आर्थिक वर्ष समाप्ती जवळ आल्याने महापालिकेने मालमत्ता कर थकबाकी वसुल करण्यास सुरुवात केली आहे. जे थकबाकीदार भरणा करत नसतील, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. अशा थकबाकीदारांचे वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

संत गाडगे बाबांना भारतरत्न द्या! वाचा कोणी केलीये मागणी

मालमत्ता कराची वसुली खालावल्याने थकबाकीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थितीही डबघाईला आली आहे. पालिकेने थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी दवंडी पिटण्यास सुरुवात केली. यामुळे मालमत्ता कर थकबाकीदारांना कर वेळेत भरण्याची आठवण होईल, असा पालिकेचा प्रयत्न होता. मात्र, या प्रयत्नांना फार प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आल्याने थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कारवाईअंतर्गत सायन येथील सेवा समिती आणि माटुंगा येथील पलई इमारतीमधील पाणी पुरवठा पालिकेने थांबवला आहे. तर याच विभागातील 8 इमारती पालिकेच्या रडारवर आहेत. मार्च महिना जवळ आल्याने पालिका प्रशासन कारवाई अधिक तीव्र करण्याची शक्‍यता आहे. 

विद्यापीठ प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका!

पालिकेने 500 चौ.फुटाच्या किंवा त्याहून कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांना मालमत्ता करामधील सर्वसाधारण कर वगळण्यात आला आहे. त्यातच स्थावर मालमत्ता क्षेत्र आणि इतर बाजारातील मंदीमुळे मालमत्ता कराची थकबाकी वाढली आहे. परिणामी मालमत्ता कराची वार्षिक मागणी अंदाजे 335 कोटींनी कमी झाली आहे. यामुळे पलिकेच्या आर्थिक स्थिती डबघाईला आली असून मालमत्ता कर थकबाकी वाढली आहे. सध्या मालमत्ता कराची संचित थकबाकी अंदाजे 15 हजार कोटी पर्यंत वाढली आहे. आर्थिक वर्ष समाप्ती जवळ आल्याने मालमत्ता कराची ही थकबाकी वसुलीसाठी पालिकेने एका बाजूला सर्व विभागांत जनजागृती सुरू केली तर दुसऱ्या बाजूला कारवाईचा बडगा ही सुरू केला आहे. 

 

मालमत्ता कर थकबाकीदरांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनेकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. पुढे ही कारवाई अधिक तीव्र करणार आहोत -

गजानन बेल्लाळे , सहाय्यक आयुक्त , पालिका 

बिल्डरांनी थकवलेला मालमत्ता कर रहिवाशांकडून वसूल करणे योग्य नाही. गरीब रहीवाशी लाखो रुपयांचा थकीत मालमत्ता कर भरू शकणार नाहीत. मालमत्ता कर थकवण्याऱ्या बिल्डरांच्या पुढील प्रकल्पांना पालिकेने परवानगी देऊ नये. 
नेहल शाह , नगरसेविका 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Property taxes begin to recover by bmc