Mumbai ST News : एसटीच्या वाहकांना निष्काळजीपणा भोवणार

ईटीआयएम मशीनच्या महसुलाचा हिशोब न लागल्यास दंडाची तरतुद; कमीत कमी 200 तर जास्तीत जास्त 1000 रूपयांचा दंड
Provision of penalty for non-accounting of ETIM machine revenue ST msrtc employee mumbai
Provision of penalty for non-accounting of ETIM machine revenue ST msrtc employee mumbai Sakal

मुंबई : एसटीच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुक करतांना ईटीआयएम मशिनमधील चुकीच्या बटन दाबल्याने तिकीटांच्या महसुलाचा हिशोबात ताळमेळ जुळत नाही. चुकीच्या पद्घतीने तिकीटांचा वापर होतांना दिसते. परिणामी यापुर्वी स्थानिक पातळीवर वाहकांवर कारवाई केली जात होती.

शिवाय वसूली सुद्धा केली जायची मात्र, आता एसटीच्या वाहतुक विभागाने अशा निष्काळजी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी 200 तर जास्तीत जास्त 1000 दंडाची तरतुद करण्यात आली असून, तशा सुचना राज्यातील विभाग नियंत्रकांना देण्यात आली आहे. वाहक किंवा कर्मचाऱ्यांनी ईटीआय मशिनमध्ये चुकीचे बटण दाबल्यास चुकीच्या नोंदी घेतल्या जाते.

यामुळे दर्शविण्यात आलेल्या रक्कमेच्या शॉर्टजमुळे तिकीटांच्या उत्पन्नाचा हिशोब लागत नाही. यामध्ये ईटीआयएम मधील सर्व तिकीटे दुहेरी सेव्ह होणे, अॅडव्हान्स बुकिंग करताना पोलिस वाॅरंटची नोंद होणे, वायआयएन बटण दाबून जास्त रक्कमेचे जादा तिकीट येणे, तिकीट ट्रेचा हिशोब तांत्रिक दोषामुळे घेता न येणे,

टोल टॅक्सची पावती नोंद करताना वाढीव रक्कम दिसने, नजरचुकीने बटण प्रेस झालेने ऑनलाईन एक्सपेंडिचरमध्ये काही रक्कम वर्ग होणे, ईटीआयम संगणकीय प्रणालीत आरएफआयडी पासचा हिशोब घेताना नजरचुकीने जादा रक्कम नोंद होणे अशा अनेक चुका वाहकांकडून केल्या जात आहे.

अशा चुका आढळल्यास सत्यता पडताळून कोणताही गैरप्रकार घडला किंवा काय याची शहानिशा करावी. दरम्यान दोषी आढळून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कमीत कमी 200 तर जास्तीत जास्त 1000 रूपये दंड करण्यात यावा अशा सुचना एसटीचे वाहतुक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहे.

मार्ग तपासणी कामगिरीतील कारवाई

(आकडेवारी 1 एप्रील 2021 ते 31 मार्च 2022)

भाडे वसुली करून तिकीट न देणे - 466

भाडे न घेता तिकीट न देणे - 1644

कमी भाडे वसूली 213

जुन्या तिकीटाची पुनविक्री 10

कमी रोकड मिळणे - 616

जादा रोकड मिळणे - 528

इतर प्रकरणे - 7063

एकूण प्रकरणे - 10540

महसुल चोरीच्या घटना वाढतील ?

बस फेरीमध्ये वाहकांकडून अनेक क्लृप्त्या वापरून महसुल लाटण्याचा प्रयत्न केला जाते, तिकीट न देता पैसे घेणे, शिल्लक पैसे न देणे, तिकीट देतांना कोऱ्या तिकीटा देणे वगैरे त्यामूळे अत्यंत किरकोळ दंडाची तरतुद एसटी महामंडळाने केल्याने भविष्यात 10 हजारांचा अपहार करा आणि 1000 दंड भरा असा पायंडा सुद्धा पडण्याची शक्यता एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळ शी बोलतांना सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com