esakal | लोकसहभागातून कचरा प्रश्न कायमचा सोडवणार : रामदास कोकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

लोकसहभागातून कचरा प्रश्न कायमचा सोडवणार : रामदास कोकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कुठलीही योजना यशस्वी करण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असून, कल्याण डोंबिवली शहरातील कचरा प्रश्न स्थानिक जनतेच्या सहभागामधून दूर करण्यात येणार आहे, अशी माहिती घनकचरा विभाग उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली.

कोकरे यांनी प्रत्यक्षात कचरा उचलणान्या ठिकाणी जाऊन नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कल्याण-डोंबिवलीमध्ये १० प्रभाग क्षेत्र कार्यालय असून खड्डे बुजवण्यास काही प्रभागांमधील कचरा खासगी ठेकेदाराकडून उचलला जातो. मात्र, ठेकेदारांविरोधात अनेक तक्रारी पालिकेकडे प्राप्त होत असतात. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार उपायुक्त रामदास कोकरे यांनी ठेकेदाराला नोटिसा देत त्यांच्याकडून सुमारे २ कोटी रुपये दंड वसूल करण्यात केले.

हेही वाचा: गावाच्या आरोग्यासाठी धावले नाशिकचे पोलिस उपायुक्त

दरम्यान, आज उपायुक्त कोकरे यांनी अधिकारी, कर्मचारी तसेच जाणीव सामाजिक संस्था अध्यक्ष प्रथमेश सावंत आदींनी कल्याण पूर्वमधील काही ठिकाणी पाहणी दौरा केला.

loading image
go to top