सह्याद्रीला जलविद्युतची वाळवी! ५९ प्रकल्पामुळे जंगले, नद्या, आदिवासींचे अस्तित्व धोक्यात

Pumped Storage Hydroelectric Projects: सह्याद्रीतील ५९ जलविद्युत प्रकल्पांमुळे जंगले, नद्या, जैवविविधता आणि आदिवासी समुदायांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
Trees Cutting For Government Project

Trees Cutting For Government Project

ESakal

Updated on: 

कर्जत : सह्याद्री ही केवळ पर्वतरांग नसून समृद्ध जैवविविधता आणि आदिवासी-ग्रामस्थांच्या जगण्याचा मुख्य आधार आहे. पण, सध्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. यासाठी डोंगर पोखरणे, जलाशय उभारणे आणि जंगलांमधून रस्ते तयार केले जात आहेत. टोरंट व टाटा जलविद्युत प्रकल्प, पोशीर, शिलार, कोंढाणे, पाली-भूतिवली धरणे, अदाणी पॉवर हब असे तब्बल सात प्रकल्प एकाच कर्जत तालुक्यात लादलेले आहेत. यामध्ये ११ हजार एकर जमीन बाधित होण्याची शक्यता आहे, असे कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समिती अॅड. कैलास मोरे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com